एसटीची केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 11:16 AM2021-05-20T11:16:04+5:302021-05-20T11:18:18+5:30

CoronaVirus Kolhapur : लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामार्ग महामंडळाची एसटी बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मालवाहतुकीकरिता सुरू आहे. त्यामुळे दिवसभरात केवळ ५० बसेस रस्त्यावर आहेत. यातील दहा बसेस रुग्णवाहिका म्हणून वापरल्या जात आहेत.

ST's only essential services continue to operate | एसटीची केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरू

लॉकडाऊनमुळे एस. टी. वाहतूक अत्यावश्यक सेवा वगळता प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकातील आगारामध्ये सोमवारी मोठ्या प्रमाणात बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या.

googlenewsNext
ठळक मुद्देएसटीची केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरू मालवाहतुकीसह रुग्णवाहिका अशा ५० बसेस रस्त्यावर : ७०० बसेस आगारात

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामार्ग महामंडळाची एसटी बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मालवाहतुकीकरिता सुरू आहे. त्यामुळे दिवसभरात केवळ ५० बसेस रस्त्यावर आहेत. यातील दहा बसेस रुग्णवाहिका म्हणून वापरल्या जात आहेत.

 जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पुकारला आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळानेही केवळ अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, पोलीस, आरोग्य विभाग, खासगी वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता सेवा सुरू ठेवली आहे.

त्यामुळे दिवसभरात गडहिंग्लज, मुरगुड, कुरुंदवाड, गारगोटी, शाहूवाडी, इचलकरंजी या मार्गावर अत्यावश्यक सेवेतील २० फेऱ्या झाल्या, तर जिल्ह्यातील ११ आगारात १० बसेस रुग्णवाहिका म्हणून कार्यरत आहेत, तर ७०० बसेस विविध आगारात उभ्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एस. टी. महामंडळाच्या सूत्रांनी दिली.
 

Web Title: ST's only essential services continue to operate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.