एसटीची प्रवासी तिकीट तपासणी मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:28 AM2021-09-24T04:28:32+5:302021-09-24T04:28:32+5:30
कोल्हापूर : एस. टी. महामंडळातर्फे २२ ते ६ ऑक्टोबर या दरम्यान प्रवासी तिकीट तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. ...
कोल्हापूर : एस. टी. महामंडळातर्फे २२ ते ६ ऑक्टोबर या दरम्यान प्रवासी तिकीट तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. त्यानुसार कोल्हापूर विभागातील सर्व आगारातील पर्यवेक्षकांमार्फत बसस्थानकासह मार्गावरही तपासणी केली जाणार आहे.
एस. टी. महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये. आपली तिकिटे काळजीपूर्वक जपून ठेवावीत. मोटार वाहन कायदा १९८८ नुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून त्याने चुकविलेल्या भाड्या व्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा १०० रु. यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. तरी प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये. प्रवास करताना तिकीट सांभाळून ठेवावे. तपासणी पर्यवेक्षकांना प्रवाशांनी सहकार्य करावे. असे आवाहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी केले आहे.