एसटी ची चाके गुरूवारपासून पुन्हा रुळावर येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 06:17 PM2020-08-19T18:17:24+5:302020-08-19T18:19:20+5:30
गेल्या चार महिन्यांपासून बंद पडलेली एस.टी.चाके आता पुन्हा गतीमान होणार आहेत राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यानूसार कोल्हापूर विभागाकडून सागंली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या चार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर गुरूवारपासून प्रवासी वाहतुक सुरू होणार आहे. अशी माहीती एसटी.महामंडळाचे कोल्हापूर विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.
कोल्हापूर : गेल्या चार महिन्यांपासून बंद पडलेली एस.टी.चाके आता पुन्हा गतीमान होणार आहेत राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यानूसार कोल्हापूर विभागाकडून सागंली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या चार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर गुरूवारपासून प्रवासी वाहतुक सुरू होणार आहे. अशी माहीती एसटी.महामंडळाचे कोल्हापूर विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.
राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने एस.टी.महामंडळाची बस सेवा गेल्या चार महिन्यापासून बंद केली होती. या काळात महामंडळाला उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने मोठ्या अर्थिक फटका बसला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार काहीकाळ रखडले होते. आंतरजिल्हा प्रवासी वाहतुक बंद केल्याने इच्छुक प्रवाशांची मोठी कोंडी झाली होती.
प्रवाशांची गैरसोय आणि काही प्रमाणात आटोक्यात आलेल्या कोरोना संसर्गामुळे राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली. त्यानूसार कोल्हापूर विभागातून सांगली ,सातारा, सोलापूर, रत्नागिरी या चार जिल्ह्यासाठी गुरूवारपासून प्रवासी वाहतुक सुरू होत आहे. ज्या मार्गावर प्रवाशांची मागणी अधिक असेल त्या मार्गावर सोईप्रमाणे जादा बसेसेही सोडल्या जाणार आहेत.
याकरीता २५ बसेस चालक, वाहकांसह सज्ज ठेवण्यात आ्रल्या आहेत. विशेष म्हणजे एस.टी.बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या कोरोना चाचणीस सामोरे जावे लागणार नाही. असेही विभाग नियंत्रक पलंगे यांनी स्पष्ट केले.