जिद्दी नेतृत्व : संजय पाटील यड्रावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:29 AM2021-09-08T04:29:01+5:302021-09-08T04:29:01+5:30
संजय पाटील-यड्रावकर यांना किंगमेकर अशी उपाधी विधानसभा निवडणुकीनंतर युवा वर्गातून मिळाली. संपूर्ण निवडणुकीचे योग्य नियोजन करताना निवडणूक कशी जिंकायची ...
संजय पाटील-यड्रावकर यांना किंगमेकर अशी उपाधी विधानसभा निवडणुकीनंतर युवा वर्गातून मिळाली. संपूर्ण निवडणुकीचे योग्य नियोजन करताना निवडणूक कशी जिंकायची याचे आराखडे त्यांनी बांधले होते. आपल्या विश्वासू सहकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेली व्यूहरचना यशस्वी झाली. त्यामुळेच चार दशके हुलकावणी देणारे यश यड्रावकर परिवाराला मिळाले. रामाच्या मागे जसा भाऊ लक्ष्मण होता तिच भूमिका संजय पाटील-यड्रावकर यांनी समर्थपणे निभावली.
विकासाचा प्रचंड दृष्टिकोन लाभलेले संजय पाटील-यड्रावकर हे व्यक्तिमत्व केवळ राजकारणच करीत नाही, तर आपल्या शहराच्या तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा करायचा याबाबतच्या संकल्पना त्यांच्या नेहमी विचाराधीन असतात. मागील पंधरा वीस वर्षात जयसिंगपूरात झालेली विकास कामे पाहता हे शहर देखील इतर प्रगत शहरांच्या यादीमध्ये समाविष्ट होत आहे. नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीची त्यांच्या संकल्पनेतून साकारणारी वास्तु लवकरच उभी राहील, ही वास्तू पाहिल्यानंतर त्यांच्या संकल्पनेतील प्रगल्भता दिसून येणार आहे. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून जयसिंगपूर शहरात उभारण्यात येणाºया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठीची जागा राज्य शासनाकडून विनामोबदला मिळवण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने नियोजनपूर्वक पाठपुरावा करीत पन्नास वर्षाच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. यासाठी त्यांना त्यांचे बंधू राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे मार्गदर्शन आणि पाठीशी असलेली अनुभवाची शिदोरी या बळावर संजय पाटील यड्रावकर यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास सुरू आहे. अशा कर्तृत्वान व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शब्दांकन - बबन यादव
फोटो - ०७०९२०२१-जेएवाय-०४-संजय पाटील-यड्रावकर