निवेदन स्वीकारले नाही म्हणून खुर्चीला चिकटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:17 AM2021-02-05T07:17:07+5:302021-02-05T07:17:07+5:30

महापालिका प्रशासनाने घरफाळा सवलत योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये ३१ जानेवारीअखेर थकबाकीसह घरफाळा रक्कम भरली तर दंडव्याजात सत्तर टक्के ...

Stuck to the chair as the statement was not accepted | निवेदन स्वीकारले नाही म्हणून खुर्चीला चिकटवले

निवेदन स्वीकारले नाही म्हणून खुर्चीला चिकटवले

Next

महापालिका प्रशासनाने घरफाळा सवलत योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये ३१ जानेवारीअखेर थकबाकीसह घरफाळा रक्कम भरली तर दंडव्याजात सत्तर टक्के सवलत देण्यात येणार आहे; परंतु थकबाकी भरण्यास नागरिक गेले असता नागरी सुविधा केंद्रांत सवलत योजनेचा आदेश मिळालेला नाही, संगणकात अपडेट झालेले नाही, असे सांगून अधिकारी, कर्मचारी नागरिकांना परत पाठवत आहेत. ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठी कृती समितीचे सदस्य बुधवारी महापालिकेत प्रशिक्षणार्थी उपायुक्त निखिल मोरे यांना भेटायला गेले होते.

परंतु मोरे निवडणूक कामानिमित्त मुंबईला गेल्यामुळे कृती समितीच्या कार्यकर्त्यांने ते भेटू शकले नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी त्यांच्या कार्यालयात खुुर्चीला निवेदन चिकटवले तसेच घोषणाही दिल्या. अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत पाटील, अंजूम देसाई, श्रीकांत भोसले, महेश लाेखंडे, रामभाऊ काळेकर, गोरख कुंभार, परवेझ सय्यद यांनी या आंदोलनात भाग घेतला.

कृती समितीचे कार्यकर्ते जेंव्हा महापालिकेत गेले तेव्हा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, घरफाळा विभागाचे प्रमुख सहायक आयुक्त विनायक औंधकर त्यांच्या कार्यालयात उपस्थित होते; पण कार्यकर्ते त्यांना भेटायला गेले नाहीत. ज्यांच्याकडे कार्यभार आहे त्यांना न भेटताच निखिल मोरे यांनाच भेटण्याच्या आग्रह धरला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे उलटसुलट चर्चा होती.

Web Title: Stuck to the chair as the statement was not accepted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.