स्पर्धा परीक्षेतील अपयशाने विद्यार्थ्याने संपवले जीवन, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 15:40 IST2024-12-10T15:40:17+5:302024-12-10T15:40:37+5:30
इचलकरंजी : खोतवाडी (ता.हातकणंगले) येथील शुभम अशोक चौगुले (वय २३, रा. शिंदे मळा) याने राहत्या घरी साडीने गळफास लावून ...

स्पर्धा परीक्षेतील अपयशाने विद्यार्थ्याने संपवले जीवन, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना
इचलकरंजी : खोतवाडी (ता.हातकणंगले) येथील शुभम अशोक चौगुले (वय २३, रा. शिंदे मळा) याने राहत्या घरी साडीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार अपयश आल्याच्या नैराश्येतून त्याने आत्महत्या केल्याचे वर्दीमध्ये म्हटले आहे.
महेश अशोक चौगुले याने दिलेल्या वर्दीमध्ये शुभम हा सातत्याने स्पर्धा परीक्षा देत होता. परंतु त्याला यश आले नाही. वारंवारच्या अपयशामुळे त्याला नैराश्य आले होते. त्यातून ८ डिसेंबरला त्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.