विद्यार्थ्यांचा वावर मैलायुक्त पाण्यातूनच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:32 AM2017-09-27T00:32:01+5:302017-09-27T00:32:01+5:30

Students' drinking water from dirty water! | विद्यार्थ्यांचा वावर मैलायुक्त पाण्यातूनच !

विद्यार्थ्यांचा वावर मैलायुक्त पाण्यातूनच !

Next



घनश्याम कुंभार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यड्राव : येथील पार्वती विद्यामंदिरच्या परिसरात ईस्ट मँचेस्टर सोसायटीचे मैलायुक्त पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यांचा वावर त्या पाण्यातूनच होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तर शाळेच्या इमारतीखालून पाण्याचे उमाळे येत असल्याने इमारतीस धोका निर्माण झाला आहे. दोन वर्षांपूर्वी शिक्षण विभागासह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी पाहणी करूनही पुन्हा असा प्रसंग उद्भवला असल्याने शिक्षण विभागासह ग्रामपंचायतीने हा प्रश्न गांभीर्याने घेतला नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
येथील पार्वती विद्यामंदिरच्या पश्चिमेस असलेल्या ईस्ट मँचेस्टर या वसाहतीमधून येणारा मैला व सांडपाणी शाळेजवळ जमा होते. जोराचा पाऊस झाल्यास ते मैलायुक्त सांडपाणी शाळेच्या परिसरात जमा होते. असाचा प्रकार दोन वर्षांपूर्वी निर्माण झाला होता. त्यावेळी तत्कालीन गटशिक्षण अधिकारी वांद्रे व ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी पाहणी करून संबंधित संस्थेस सांडपाणी निचरा व्यवस्था करण्यास कळविले होते.
याबाबत संबंधित ईस्ट मँचेस्टर वसाहत प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही. तसेच शिक्षण विभाग व ग्रामपंचायतीने याबाबत पाठपुरावा केला नसल्याने तो प्रश्न तसाच राहिला आणि रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे वसाहतीचे संपूर्ण मैलायुक्त पाणी शाळेच्या परिसरात पसरले. यातूनच विद्यार्थी, शिक्षक, पालकांना ये-जा करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या पाण्यामुळे विद्यामंदिरच्या इमारतीखालून पाण्याचे उमाळे येत आहेत. त्याचबरोबर वाळू, माती वाहून जात आहे. यामुळे इमारतीस धोका पोहोचू शकतो. विद्यार्थ्यांना
ये-जा करण्यासाठी मुरुमाचा भराव टाकून रस्ता उपलब्ध करावा लागणार आहे. पाणी जाण्यासाठी रस्त्याखालून पाईप घालावी लागेल. यामुळे पुन्हा हा प्रश्न उद्भवणार नाही. याकरिता संबंधित संस्थेला सांडपाणी निचरा व्यवस्था करण्यास भाग पाडावे. यासाठी कारवाई करण्याची गरज असताना शिक्षण विभाग व ग्रामपंचायत याकडे गांभीर्याने
पाहत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
‘ईस्ट मँचेस्टर’वर फौजदारी दाखल करा
पार्वती विद्यामंदिरमध्ये येणाºया मैलायुक्त सांडपाण्याच्या परिसराची पाहणी पंचायत समितीचे सभापती मल्लाप्पा चौगुले, प्रभारी गटशिक्षणाधिकारी
आर. डी. काळगे, उपसरपंच विजय पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप हिंगे, ग्रामविकास अधिकारी जी. डी. आदलिंग, आदींनी
केली व याबाबत ईस्ट मँचेस्टर गृहप्रकल्पाचे अभियंता नीलेश कदम व रवी बोहरा यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांच्या बेजबाबदारपणासाठी फौजदारी दाखल करण्याचा निर्णय शाळेमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
गृहप्रकल्पाच्या चौकशीची मागणी
ईस्ट मँचेस्टर या गृहप्रकल्पात १६० सदनिका आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी ग्रामपंचायतीकडे मिळकतीची नोंद केलेली नाही. यामुळे या गृहप्रकल्पाने लाखो रुपयांचा कर चुकविलेला आहे. या प्रकल्पास मंजुरी कोणाची, त्यावर नियंत्रण कोणाचे, याबाबत ग्रामपंचायत अनभिज्ञ आहे. या प्रकल्पाने स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केली असल्याने त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी उपसरपंच विजय पाटील यांनी पं. स.चे सभापती मल्लाप्पा चौगुले यांच्याकडे केली.

Web Title: Students' drinking water from dirty water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.