कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:08 PM2018-08-03T13:08:09+5:302018-08-03T13:12:39+5:30
खासदार धनंजय महाडिक यांनी इथून दिल्लीला नेलेल्या शालेय मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या विद्यार्थ्यांशी आपुलकीने मराठी भाषेतून संवाद साधल्याने सर्वच विद्यार्थी भारावले.
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांनी इथून दिल्लीला नेलेल्या शालेय मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या विद्यार्थ्यांशी आपुलकीने मराठी भाषेतून संवाद साधल्याने सर्वच विद्यार्थी भारावले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३० शालेय मुला-मुलींनी बुधवारी विमानातून थेट दिल्ली गाठली. या मुलांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी कोल्हापूरच्या या मुलांशी मराठीमधून संवाद साधत, त्यांची आस्थेने आणि आपुलकीने विचारपूस केली.
शिवाय नव्या पिढीच्या मनातील कल्पना, त्यांचे प्रश्न जाणून घेतले. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी, अभिनव संकल्पनेतून कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील निवडक मुलांना दिल्लीला नेऊन संसदेचे कामकाज, राष्ट्रपती भवन तर दाखवलेच; पण पंतप्रधानांची भेट घालून दिल्याने, या मुलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पंतप्रधान मोदी यांनी, खासदार महाडिक यांच्या संकल्पनेचेही भरभरून कौतुक केले.