विद्यार्थी शाळेच्या दारात ... शिक्षक मात्र घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:21 AM2021-02-07T04:21:37+5:302021-02-07T04:21:37+5:30
चौकट...आमचा पगार सुरू आहे... शिक्षक शाळेत न आल्याने पालक संतापले होते. शाळेमध्ये वेळेवर येणे व दिलेल्या नियमाप्रमाणे तास ...
चौकट...आमचा पगार सुरू आहे...
शिक्षक शाळेत न आल्याने पालक संतापले होते. शाळेमध्ये वेळेवर येणे व दिलेल्या नियमाप्रमाणे तास घेणे, अध्यापन करणे ही अपेक्षा पालकांनी व्यक्त केली. तिसरीच्या वर्गातील एक शिक्षिका सव्वानऊ वाजता शाळेत आल्या होत्या. त्यांनी आम्ही ऑफिसमध्ये बसून परत जातो, आमचा पगार सुरू आहे. त्यामुळे सोमवारपासून विद्यार्थ्यांना शाळेत येऊ नका, असा निरोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी शिक्षणाधिकारी उबाळे यांना कळवला.
चौथीच्या वर्गाला दर शनिवारी सुटी जाहीर
शिक्षण विस्तार अधिकारी भारती कोळी यांनी शाळेमध्ये तपासणी केली असता, सातपैकी चार शिक्षक उशिरा आल्याचे निदर्शनास आले. विस्तार अधिकारी यांनी याचा अहवाल जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडे देणार असल्याचे सांगितले.
मुख्याध्यापक मिटिंगच्या नावाखाली शाळेमध्ये अनुपस्थित होते. अकरा वाजता असलेल्या मिटिंगसाठी मुख्याध्यापक सकाळपासूनच शाळेकडे फिरकले नाहीत.
कोणतीही परवानगी व पूर्वसूचनेशिवाय चौथीच्या वर्गाला दर शनिवारी सुटी जाहीर केल्याचा प्रकार समोर आला. विस्तार अधिकारी यांनी हजेरी रजिस्टर तपासले असता, यामधेही अनियमितता दिसून आली. शिक्षकांच्या या बेशिस्त वर्तनावर सर्वच पालकांनी कारवाईची मागणी केली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील, सरपंच महादेव कांबळे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती संभाजी साळोखे, अजित चव्हाण, प्रमोद पाटील, उत्तम पाटील, सुरेश साळोखे, पोलीस पाटील उमेश लोहार, मेघा पाटील, रोहिणी पाटील, देवेंद्र सरनाईक यांच्यासह पालक उपस्थित होते.
फ़ोटो : ०६ गिरगाव शाळा
ओळी :
शिक्षण विस्तार अधिकारी यांनी गिरगाव येथील शाळेतील शिक्षकांना खडे बोल सुनावले.