शाहू महाराजांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:16 AM2021-06-27T04:16:31+5:302021-06-27T04:16:31+5:30
कळे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी होते. जाती व्यवस्थेमुळे पिचलेल्या ...
कळे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी होते. जाती व्यवस्थेमुळे पिचलेल्या वर्गातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्य आणि कर्तृत्वाने केले. ते कर्तृत्ववान राष्ट्रपुरुष होते. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ सहा. शिक्षक. एन. एन. भोसले यांनी केले. ते कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज येथे राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. जी. गुरव होते.
सानिका विजय कालेकर व ऋतुजा निरंजन कालेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशालेतील विद्यार्थ्यांची कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थिती होती.
यावेळी पर्यवेक्षक ए. बी. गायकवाड, एस. एच. कवठेकर, पी. ए. हावळ, एस. आर. भोई, एस. आर. वलेकर, एस. एस. पेंढारकर, वाय. एस. वराळे, एन. एन. पाटील, प्रा. बी. बी. कांबळे, प्रा. एस. बी. सावंत, प्रा. एस. एस. खांबे, प्रा. आर. डी. कुलकर्णी, पी. एस. कालेकर, एस. एन. काळे, दादासाो माळवे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक विभागप्रमुख पी. बी. खामकर यांनी केले. सूत्रसंचलन अनुष्का बाजीराव डवंग व सुहानी नंदकुमार कुंभार यांनी केले. तर आभार प्रा. व्ही. डी. कोळी यांनी मानले.