विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:46 AM2021-02-06T04:46:13+5:302021-02-06T04:46:13+5:30
कोल्हापूर : सध्याच्या तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत आहेत. एका क्लिकवर संपूर्ण जग आपल्या जवळ आले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ...
कोल्हापूर : सध्याच्या तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत आहेत. एका क्लिकवर संपूर्ण जग आपल्या जवळ आले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यासाठी संगणकाचे प्रशिक्षण आवश्यक आहे. संगणक युगात विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी गुरुवारी केले.
जवाहरनगर येथील सिरत मोहल्ला येथे नगरसेवक भूपाल शेटे यांच्या प्रयत्नातून सांस्कृतिक सभागृह उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी दहा संगणक भेट दिले आहेत. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संगणक प्रदान करण्यात आले.
सिरस मोहल्ला परिसरातील मुस्लिम समाजातील मुलींसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सोयी-सुविधा देत आहोत, त्याचे समाधान आहे. भविष्यात मतदारसंघातील मुला-मुलींना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. यावेळी माजी उपमहापौर नगरसेवक भूपाल शेटे, सिद्धिक कच्छी, जाफर मोमीन, इम्तियाज बागवान, विजय पाटील, प्रसन्न वैद्य, जावेद सय्यद, रियाज बागवान, अरुण बारामते, नीलेश सोनवणे, प्रसाद शेटे, बाबू बुचडे, संदीप गायकवाड, जगमोहन भुर्के, प्रसाद वैद्य, आलम मुजावर, चाचा शेख आदी उपस्थित होते.
फोटो (०५०२२०२१-कोल- संगणक वाटप) : कोल्हापुरातील जवाहरनगरमधील सिरत मोहल्ला येथील सांस्कृतिक केंद्रासाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते गुरुवारी संगणक प्रदान करण्यात आले. यावेळी भूपाल शेटे, सिद्धिक कच्छी, जाफर मोमीन, इम्तियाज बागवान, विजय पाटील, प्रसन्न वैद्य आदी उपस्थित होते.