विद्यार्थ्यांनी करिअरच्या नवीन संधी शोधाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:18 AM2021-07-18T04:18:18+5:302021-07-18T04:18:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी बदलत्या काळाची दिशा ओळखून विद्यार्थ्यांनी करिअरच्या नवीन संधींचा शोध घ्यावा. ...

Students should look for new career opportunities | विद्यार्थ्यांनी करिअरच्या नवीन संधी शोधाव्यात

विद्यार्थ्यांनी करिअरच्या नवीन संधी शोधाव्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी बदलत्या काळाची दिशा ओळखून विद्यार्थ्यांनी करिअरच्या नवीन संधींचा शोध घ्यावा. पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्य विकासाला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पोळ यांनी केले.

येथील शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाच्यावतीने ऑनलाईन स्वरूपात आयोजित विजयवंत महोत्सवाचा समारोप झाला. त्यावेळी पोळ बोलत होते. अध्यक्षस्थानी सचिव विद्या पोळ होत्या.

पोळ म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात ज्ञानार्जनाबरोबरच शारीरिक क्षमतांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घ्यावी. स्वतःबरोबर आपले कुटुंब व समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमामध्ये विजयवंत महोत्सवातील विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयसिंह यादव, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विजया चव्हाण यांनी केले. शोभा देसावळे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रशांत भोरे यांनी केले.

यावेळी प्राचार्य डॉ. सरदार जाधव, प्राचार्य प्रदीप पाटील, उपप्राचार्य किरण कोळी, डॉ. सचिन पवार, आनंदी माने, श्रुती महाजन, दयावती चव्हाण, अरुणा देवस्थळी आदी उपस्थित होते.

१७ विजयसिंह यादव महाविद्यालय

फोटो कॅप्शन : पेठवडगाव येथे स्व. विजयसिंह यादव जयंतीनिमित्त आयोजित विजयवंत महोत्सवाच्या समारोपप्रसंगी माजी पोलीस आयुक्त व अध्यक्ष गुलाबराव पोळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्या पोळ, प्रदीप पाटील, डाॅ. सरदार जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Students should look for new career opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.