विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्त चळवळीत पुढाकार घ्यावा : डॉ. कलशेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:37 AM2019-09-23T10:37:33+5:302019-09-23T10:38:54+5:30
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकासमोरील त्यांच्या पुतळ्यास आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. कलशेट्टी यांनी, प्रत्येक विद्यार्थ्याने प्लास्टिकमुक्त चळवळीत पुढाकार घ्यावा, त्यांनी किमान पाच घरांत प्रबोधन करावे, असे आवाहन केले.
कोल्हापूर : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकासमोरील त्यांच्या पुतळ्यास आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. कलशेट्टी यांनी, प्रत्येक विद्यार्थ्याने प्लास्टिकमुक्त चळवळीत पुढाकार घ्यावा, त्यांनी किमान पाच घरांत प्रबोधन करावे, असे आवाहन केले.
आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी रा. छ. शाहू कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्लास्टिक मुक्त कोल्हापूर व स्वच्छतेबाबत आयुक्तांनी शपथ दिली. रा. छ. शाहू कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आपल्या परिसरातील किमान पाच घरांमध्ये प्लास्टिक मुक्तीबाबत प्रबोधन केले पाहिजे, (रेड्यूस, रिव्हूज, रिसायकल) या मोहिमेत प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे, असे सांगितले.
यावेळी उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, कनिष्ठ अभियंता मिरा नागिमे, अरविंद भोसले, दिलीप पोवार, रा. छ. शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे, प्रा. आर. पी. देठे, व्ही. व्ही. किल्लेदार, एस. एस. साठे, एन. एस. साळुंखे, आर. सी. पाटील, एस. एस. लवेकर, बी. एम. शिनू, रा. छ. शाहू कॉलेजचे एन. एस. एस, एन. सी. सी., कमवा व शिका योजनेतील शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.