विद्यार्थ्यांत आज रंगणार ‘शब्दांचे वॉर’
By admin | Published: February 13, 2015 12:40 AM2015-02-13T00:40:54+5:302015-02-13T00:44:22+5:30
‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे स्पर्धा : सदस्यता नोंदणीचा फुटणार ‘लकी ड्रॉ’
कोल्हापूर : निवडणुकांच्या जाहीर प्रचारापासून ते सामाजिक कार्यापर्यंत, एखाद्या विषयावर वादविवादापासून खिल्ली उडविण्यापर्यंत असा माहितीचा खजिना क्षणात आपल्या पर्यंत पोहोचवणारे प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाला पसंती दिली जाते. तरुणार्ईची याला प्रचंड पसंती आहे. आणि म्हणूनच या सोशल मीडियाविषयी तरुणाईच्या भावना जाणून घेण्यासाठी ‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे आज, शुक्रवारी ‘वॉर आॅफ दि वर्डस’ ही डिबेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ‘युवा नेक्स्ट’च्या सदस्यता नोंदणीचे लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत.
आपण व्हॉट्स अॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, वुई चॅट अशा अनेक माध्यमांतून जोडले जाताना त्याचे फायदे पाहतो. मात्र, त्यासोबत त्याचे धोकेही तितकेच गंभीर आहेत. तरुणांमध्ये त्याविषयी मतमतांतरे होते. या चर्चेला व्यासपीठ मिळण्यासाठी कदमवाडीतील ‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट’ या महाविद्यालयात दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत ‘वॉर आॅफ दि वर्डस’ ही डिबेट ही स्पर्धा होणार आहे. यात विद्यार्थ्यांनी ‘सोशल नेटवर्किंग आयुष्याचा अविभाज्य घटक बनत चालला आहे का?’ या विषयावर मते मांडायची आहेत. स्पर्धेला नेटसॉफ्ट टेक्नॉलॉजीस यांचे प्रायोजकत्व व भारती विद्यापीठ शिक्षण संस्थेचे सहकार्य लाभले आहे.
दरम्यान, सायंकाळी साडेसहा वाजता ‘युवा नेक्स्ट २०१४-१५’ या वर्षातील सदस्यता नोंदणीचे लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. यात विजेत्या विद्यार्थ्यांना पार्थ आॅप्टिक्सतर्फे गॉगल्स, साई स्पोर्टस्तर्फे ट्रॅकसुट व बॉक्स आॅफिस रेंट अॅँड सेलच्यावतीने गिफ्ट व्हाउचर्स देण्यात येणार आहेत. प्रायोजक नेटसॉफ्ट टेक्नॉलॉजीस ही संस्था गेली १४ वर्षे राजारामपुरी येथे कार्यरत असून, येथे नामवंत कंपन्यांचे सर्टिफि केट कोर्सेस शिकविले जातात. ‘व्हीयूई’ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे परीक्षा केंद्रही येथे आहे. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा व माहितीसाठी सचिन : ९७६७२६४८८५ व ०२३१-२६४१७०७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या युवा नेक्स्टच्या सदस्यांनी सोबत युवा नेक्स्टचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे अन्यथा फी आकारली जाईल. अन्य विद्यार्थ्यांना ३० रुपये प्रवेश फी भरावी लागेल. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे रुपये पंधराशे, एक हजार व पाचशे रुपये रोख बक्षीस व सन्मानचिन्ह दिले जाईल.