बावड्याच्या श्रीराम संस्थेस अभ्यास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:24 AM2021-02-10T04:24:11+5:302021-02-10T04:24:11+5:30
कसबा बावडा : वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था, पुणे या संस्थेच्यावतीने कोलॅबरेटीव्ह इंटरनॅशनल एक्सपोजर व्हिजिट प्रोग्रॅम ऑन को-ऑपरेटिव्ह ...
कसबा बावडा :
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था, पुणे या संस्थेच्यावतीने कोलॅबरेटीव्ह इंटरनॅशनल एक्सपोजर व्हिजिट प्रोग्रॅम ऑन को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॉडेल ट्रेनिंग याअंतर्गत प्रशिक्षणसंदर्भात येथील श्रीराम सेवा संस्थेस अभ्यास भेट दिली. याअंतर्गत ब्रम्हदेश, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान येथील प्रशिक्षणार्थींनी ऑनलाईन सहभाग घेत संस्थेच्या कार्याची माहिती घेतली.
येथील श्रीराम सेवा संस्था ही सहकार क्षेत्रातील अद्ययावत सेवा देणारी व आशिया खंडात नावाजलेली सहकारी संस्था आहे. संस्थेच्या विविध शाखांच्या माध्यमातून कामकाजाचे जाळे विखुरलेले आहे. या संस्थेस देशभरातील अनेक सहकारी संस्था भेट देऊन कामकाजाची पाहणी करत असतात. त्याचअंतर्गत वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन, पुणे या संस्थेचे प्रकल्प संचालक वाय. ए. पाटील व प्रशिक्षण केंद्र सल्लागार डी. रवी यांनी बुधवारी भेट देऊन संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली.
संस्थेचे ज्येष्ठ संचालक राजीव चव्हाण यांनी संस्थेच्या प्रगतीबाबतची माहिती दिली. यावेळी प्रशिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक वाय. ए. पाटील यांचे स्वागत सभापती धनाजी गोडसे यांनी, तर सल्लागार डी. रवी यांचे स्वागत उपसभापती संतोष ठाणेकर यांनी केले. संचालक विलास पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संचालक हरी पाटील, मदन जामदार, प्रमोद पाटील, प्रशांत पाटील, प्रवीण लाड, संतोष पाटील, संजय केंबळे, कुंडलिक परीट, सुधाकर कसबेकर, जया उलपे, वनिता बेडेकर, नंदिनी रणदिवे, व्यवस्थापक शरदचंद्र उलपे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.