सुधारित बातमी) पोलीस उपनिरीक्षकास ५ हजारांची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:23 AM2021-02-12T04:23:50+5:302021-02-12T04:23:50+5:30
पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : कोडोली येथील तक्रारदाराविरोधात महिन्यापूर्वी वडगाव पोलीस ठाण्यात पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त ...
पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी :
कोडोली येथील तक्रारदाराविरोधात महिन्यापूर्वी वडगाव पोलीस ठाण्यात पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास उपनिरीक्षक भोसले करीत होता. गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी भोसले याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा लावला होता. पोलीस ठाण्यात त्याच्या कार्यालयात पोलीस उपनिरीक्षक भोसले पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सहायक फौजदार संजीव बबंरगेकर, हवालदार शरद पोरे, पोलीस नाईक नवनाथ कदम, सुनील घोसाळकर आदींच्या पथकाने केली.
चौकट -
जिल्ह्यात ‘लाचलुचपत’चा कारवाईचा धडाका सुरू..! जिल्ह्यात शासकीय अधिकाऱ्यांवर लाचेची मागणी केल्याप्रकरणी सलग कारवाईचा धडाका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कारवाईची टांगती तलवार असतानाही अधिकाऱ्यांनी बोध घेतला नसल्याचे दिसते. त्यामुळेच ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात सापडणे सुरू आहे.