दोन हजारांची लाच घेताना उपकोषागार अधिकारी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:28 AM2021-02-09T04:28:30+5:302021-02-09T04:28:30+5:30
कागल : येथील उपकोषागार कार्यालयात स्थानिक औषध खरेदीची बिले मंजूर करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना उपकोषागार अधिकाऱ्याला ...
कागल : येथील उपकोषागार कार्यालयात स्थानिक औषध खरेदीची बिले मंजूर करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना उपकोषागार अधिकाऱ्याला लाचलुचपत खात्याने रंगेहात पकडले. मिलिंद मधुकर कुलकर्णी (वय ५५, उपकोषागार अधिकारी, वर्ग - २, रा. प्लॉट नं. ६९, अरुणोदय को-ऑप. सोसायटी, शाहू पार्क, राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. ही कारवाई सायंकाळी सातच्या सुमारास करण्यात आली.
मुरगूड ग्रामीण रुग्णालय येथील स्थानिक औषध खरेदीची २० हजार रुपयांची बिले या कार्यालयात मंजुरीसाठी पाठविली होती. ती बिले मंजूर करण्यासाठी कुलकर्णी याने लाच मागितली होती. सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात आरोपी सापडला. कार्यालयातच लाच घेताना त्यास रंगेहात पकडण्यात आले. कागल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
फोटो : ०८मिलिंद कुलकर्णी