महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना RBI कडून रद्द; ठेवीदारांमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:21 AM2020-12-25T04:21:10+5:302020-12-25T11:59:37+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कारवाई केली आहे. कोल्हापुरातील सुभद्रा लोकल एरिया लिमिटेड बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह ...
कोल्हापूर :
महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कारवाई केली आहे. कोल्हापुरातील सुभद्रा लोकल एरिया लिमिटेड बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. उद्योगपती अण्णासाहेब मोहिते यांनी सुरु केलेल्या या बँकेच्या कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत १३ शाखा आहेत. या बँकेचे अन्यत्र विलीनीकरण होणार असल्याचे सांगण्यात येते.
सुभद्रा बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने याआधीच निर्बंध लागू केले होते. त्यानंतर गुरुवारी या बँकेच्या कामकाजावर बंदी घातल असल्याचं आरबीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे. आरबीआयच्या कारवाईमुळे बँकेच्या ठेवीदारांमध्ये गोंधळ उडाला आहे.
सुमारे २००३ च्या सुमारास या बँकेची स्थापना झाली. सुमारे दीडशे कर्मचारी बँकेत काम करतात. पूर्वी स्टेट बँकेच्या कोषागार शाखेजवळ मुख्यालय होते. ते अलीकडील काही वर्षात जेम्सस्टोन संकुलात स्थलांतरित झाले आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या दोन महिन्यांपासून बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणले होते. त्यामुळे कर्जव्यवहार पूर्णत: बंद होता. फक्त कर्जवसुलीस प्राधान्य द्यावे, अशा सूचना होत्या. ठेवीदारांचे पैसे नियमित परत मिळत होते. त्याबद्दल कुणाची तक्रार नव्हती. तरीही बँकिंग परवाना का रद्द झाला हे समजू शकले नाही.