पूररेषेतील बांधकामाचा विषय हरित लवादासमोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:36 AM2019-07-17T11:36:55+5:302019-07-17T11:37:44+5:30
पंचगंगा नदीचे प्रदूषण आणि पूररेषेतील बेकायदेशीर बांधकामे यासंबंधाने दाखल झालेल्या याचिकेवर मंगळवारी दिल्लीतील राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी झाली.
कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण आणि पूररेषेतील बेकायदेशीर बांधकामे यासंबंधाने दाखल झालेल्या याचिकेवर मंगळवारी दिल्लीतील राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी झाली.
या सुनावणीदरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वत: हजर राहून पंचगंगा प्रदूषणासंदर्भात केलेल्या उपाययोजना आणि भविष्यकाळात केल्या जाणाऱ्या उपाययोजना यांची माहिती हरित लवादासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली.
याबाबत एप्रिल महिन्यात सुनावणी झाली होती. तेव्हा आयुक्त किंवा सक्षम अधिकाऱ्याने पुढील सुनावणीवेळी उपस्थित राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार मंगळवारी स्वत: आयुक्त उपस्थित होते. डॉ. शेलार यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यात राज्य सरकार तसेच महानगरपालिकेला प्रतिवादी केले आहे.