पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा सविस्तर कृती आराखडा सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:45+5:302021-02-06T04:45:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नदी स्वच्छता मोहिमेसाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली असून त्याअंतर्गत पंचगंगा प्रदूषण ...

Submit a detailed action plan for de-pollution of Panchganga | पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा सविस्तर कृती आराखडा सादर करा

पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा सविस्तर कृती आराखडा सादर करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : नदी स्वच्छता मोहिमेसाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली असून त्याअंतर्गत पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठीचा निधी आणता येईल. त्यासाठी केंद्राला अभिप्रेत असलेल्या नियमावली व मार्गदर्शक सूचनांनुसार सविस्तर कृती आराखडा लवकरात लवकर सादर करा, अशी सूचना खासदार संजय मंडलिक यांनी शुक्रवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका व नगरपंचायतींच्या अधिकाऱ्यांना दिली.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जानेवारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा २२० कोटींचा आराखडा सादर केला आहे. त्याचे सूक्ष्म नियोजन करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवा, असे निर्देश त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले होते. केंद्र सरकारनेदेखील देशातील नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. पंचगंगेसाठी निधी मिळावा यासाठी खासदार मंडलिक यांचे केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू आहे. मात्र, त्यासाठी प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आराखड्याची नेमकी स्थिती काय आहे याची माहिती घेण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी रवींद्र आंधळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, प्रशांत जाधव, मनिष पवार यांच्यासह नगरपालिका अधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार मंडलिक यांनी आराखड्यासाठी किती कोटींचा निधी लागणार आहे, प्राधान्याने कोणती कामे करावी लागणार आहेत असा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे. भविष्यात महापालिका क्षेत्रातील सांडपाण्याचे प्रमाण वाढणार असूुन वाढीव २५ एमएलडीसाठी एसटीपी प्लँट तयार केला पाहिजे, जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या ३९ गावांसाठी आधुनिक टेक्नॉलॉजी असलेली प्लँट द्यावेत. केंद्राला अभिप्रेत असा सविस्तर आराखडा लवकरात लवकर सादर करावा, अशा सूचना केल्या. रवींद्र आंधळे यांनी पंचगंगा प्रदूषणाची सद्य:स्थिती व प्राधान्याने करायच्या बाबींची माहिती दिली.

----

Web Title: Submit a detailed action plan for de-pollution of Panchganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.