यंत्र तोडणीच्या उसाची १ टक्के वजावट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:42 AM2021-03-13T04:42:51+5:302021-03-13T04:42:51+5:30

खोची : यंत्राने तोडणी केलेल्या उसाची कपात एक टक्के करावी या मागणीसाठी गुरुवारी, नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी ...

Subtract 1% of machine cutting sugarcane | यंत्र तोडणीच्या उसाची १ टक्के वजावट करा

यंत्र तोडणीच्या उसाची १ टक्के वजावट करा

Next

खोची : यंत्राने तोडणी केलेल्या उसाची कपात एक टक्के करावी या मागणीसाठी गुरुवारी, नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखान्यावर ढोल वाजवा आंदोलन करण्यात आले. जय शिवराय किसान संघटना व आंदोलन अंकुश यांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने म्हणाले, साखर आयुक्तांनी २७ जानेवारीला कारखान्यांना १ टक्केपेक्षा जास्त वाजवट करू नये, असे कळविले आहे; परंतु बहुतांश कारखान्यांनी याची अंमलबजावणी न करता पाच टक्के कपात करीत आहेत. या बेकायदेशीर कृतीला विरोध करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. यंत्राने तोडणी केलेल्या उसाची कपात १ टक्का करून शेतकऱ्यांना ४ टक्का परतावा द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी आंदोलक व कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, संचालक अप्पासाहेब चौगुले यांच्यात चर्चा झाली.

साखर आयुक्त यांनी पाचटाचे वजन वजावटीचे प्रमाण निश्चित करण्यासाठी अभ्यास गट नियुक्त केला आहे. त्यांनी जो निर्णय देतील त्या पद्धतीने वजावट करण्यात येईल, असे कार्यकारी संचालक डिग्रजे यांनी सांगितले.

यावेळी धनाजी चुडमंगे, उत्तम पाटील, गब्बर पाटील, उदय होगले, शीतल कांबळे, बजरंग अवघडे, नारायण थोरवत, चंद्रकांत माने, प्रताप चव्हाण, सुभाष माने, अविनाश लाड उपस्थित होते.

Web Title: Subtract 1% of machine cutting sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.