सरावामध्ये सातत्य ठेवल्यास यश निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:07+5:302021-06-16T04:32:07+5:30
कदमवाडी : सरावामध्ये सातत्य ठेवून चांगला खेळ केला तर यश नक्कीच मिळेल, असा विश्वास कोल्हापूर हॉकीचे सेक्रेटरी ...
कदमवाडी : सरावामध्ये सातत्य ठेवून चांगला खेळ केला तर यश नक्कीच मिळेल, असा विश्वास कोल्हापूर हॉकीचे सेक्रेटरी मोहन भांडवले यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी लाइन बझारने आजपर्यंत अनेक खेळाडू घडवले असून ते पुढे अधिकारी झाल्याचे सांगितले. ते एस. जे. फाउंडेशनच्यावतीने आयोजित सब-ज्युनिअर मुलांच्या हॉकी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या हस्ते झाले. या हॉकी शिबिरास NIC कोच अनिकेत मोरे, राहुल गावडे व ओंकार कावरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी हाॅकी कोल्हापूरचे संचालक सागर येवलूजे, संताजी भोसले, इजाज शेख, लक्ष्मण गायकवाड, राष्ट्रीय हॉकी पंच संदीप जाधव, विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरामध्ये एकूण ५० मुलांनी सहभाग घेतला आहे.
फोटो : १५ हॉकी लाइन बझार
सब-ज्युनिअर मुलांच्या हॉकी शिबिराचे उद्घाटन हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हाॅकी कोल्हापूरचे संचालक सागर येवलूजे, मोहन भांडवले, संताजी भोसले, इजाज शेख, लक्ष्मण गायकवाड, संदीप जाधव उपस्थित होते.