भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे नायपर परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:18 AM2021-07-18T04:18:11+5:302021-07-18T04:18:11+5:30

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एज्युकेशन अँड रिसर्च हैदराबाद यांच्यावतीने जुलै २०२१ मध्ये राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या नायपर २०२१ या ...

Success in Bharati University College of Pharmacy's Nipper Exam | भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे नायपर परीक्षेत यश

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे नायपर परीक्षेत यश

googlenewsNext

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एज्युकेशन अँड रिसर्च हैदराबाद यांच्यावतीने जुलै २०२१ मध्ये राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या नायपर २०२१ या परीक्षेत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूरने यश संपादन केले. ही परीक्षा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एम.फार्मसी प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळी घेतली जाते. महाविद्यालयातील धनंजय भटाणे, अभिषेक पंतोजी, प्रवीण गुडवळेकर, मयूर चंदवानी, शुभम बरीदे, श्रवण राजपुरोहित, स्नेहल जाधव, अवधूत कळंबे, प्राची मेहतर, ऋषिकेश माळी, मृणाल डफळे, अतिश कोरे, श्वेता पवार, जेद सय्यद, शीला धोंडी, नागेश नीलावर, विनीत परीट, इशा साळुंके या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, उपप्राचार्य डॉ एम. एस. भाटिया, नायपर समन्वयक प्रा. वी. टी. पवार, शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थांना भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी अभिनंदन केले.

Web Title: Success in Bharati University College of Pharmacy's Nipper Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.