शिरसंगी येथे विहिरीत पडलेल्या गव्याला बाहेर काढण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:22 AM2021-04-10T04:22:54+5:302021-04-10T04:22:54+5:30

गव्यांचे कळप सिरसंगी परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. रात्रीच्या सुमारास मुकुंद देसाई यांच्या शेतातील विहिरीत पाण्यासाठी आलेला गवा पडला होता. ...

Success in getting the cow out of the well at Shirsangi | शिरसंगी येथे विहिरीत पडलेल्या गव्याला बाहेर काढण्यात यश

शिरसंगी येथे विहिरीत पडलेल्या गव्याला बाहेर काढण्यात यश

Next

गव्यांचे कळप सिरसंगी परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. रात्रीच्या सुमारास मुकुंद देसाई यांच्या शेतातील विहिरीत पाण्यासाठी आलेला गवा पडला होता. याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच ग्रामस्थांच्या मदतीने गव्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले.

सुरुवातीला गवा पडलेल्या विहिरीत पाणी सोडण्यात आले. विहिरीतील पाणी वरती आल्यानंतर विहिरीला जेसीबी मशीनच्या सहाय्याने मोठी चर खंदून वाट करण्यात आली. त्यातून गव्याला बाहेर काढण्यात आले. ही कारवाई आजरा वनपरिक्षेत्र अधिकारी अमरजित पवार, दक्षिण आजरा वनपाल डी. बी. काटकर, वनसेवक शिवाजी खांडेकर, शिवाजी मटकर, शिरसंगी सरपंच संदीप चौगुले, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश कानडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------------------

*

फोटो ओळी : शिरसंगी (ता. आजरा) येथील मुकुंद देसाई यांच्या विहिरीत पडलेला गवा.

क्रमांक : ०९०४२०२१-गड-०५

Web Title: Success in getting the cow out of the well at Shirsangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.