देव-देवतांच्या आशीर्वादामुळेच जीवनात यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:29 AM2021-08-28T04:29:26+5:302021-08-28T04:29:26+5:30
म्हाक वेः मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थाने असतात. देव-देवतांच्या आशीर्वादामुळेच सामाजिक आणि राजकीय जीवनात यशस्वी ...
म्हाक वेः मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थाने असतात. देव-देवतांच्या आशीर्वादामुळेच सामाजिक आणि राजकीय जीवनात यशस्वी झालो.त्यामुळे मंदिरांच्या उभारणीला निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
पिराचीवाडी (ता. कागल) येथे श्री हनुमान मंदिराच्या वास्तुशांती सोहळ्यात ते बोलत होते.
जि.प.सदस्य मनोजभाऊ फराकटे म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत लोकनियुक्त सरपंच भोसले यांनी दुर्गम व कोरडवाहू पिराचीवाडीचा चेहरामोहरा बदलून सर्वांगसुंदर गाव बनविले आहे.
येथील ऐतिहासिक तलाव व बुरुजाच्या परिसरात हे देवालय साकारले आहे.मंत्री मुश्रीफ यांच्या २० लाख निधीतून मंदिर व लोकवर्गणीतून कळस उभारला आहे. ग्रामस्थ, भाविक भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात टाळ-मृदंगांच्या गजरात दिंडी सोहळा झाला. दिवसभरात दिंडी पूजन, मूर्तीचे आगमन, होम -हवनासह कलशारोहण, सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन झाले.
सरपंच सुभाष भोसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जि. प. सदस्य मनोजभाऊ फराकटे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, बी. एम. पाटील, ह.भ.प. उद्धवजी जांभळे - महाराज, अरुण भोसले, सागर चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत तानाजी पाटील यांनी केले. पांडुरंग भोसले यांनी आभार मानले.
चौकट
शरदभक्त हनुमान........!
स्वामीनिष्ठा काय असते,याची ज्वलंत प्रचिती देणाऱ्या रामभक्त हनुमानाची छाती जरी फाडली तरी रामच दिसेल एवढी त्यांची अपार भक्ती. मलाही लोक शरदभक्त हनुमान म्हणतात असे मंत्री मुश्रीफ म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली.
चौकट- पिराचीवाडी बदलाचे कौतुक.....
गावाला चारही बाजूंनी रस्ते नव्हते. पाण्याचा गंभीर प्रश्न होता. मात्र, सरपंच भोसले यांनी सर्व प्रश्न मार्गी लावलेच त्याशिवाय हमालांचे गाव ही ओळखही पुसली. भोसले यांनी आवाहनात्मक असणारी पाणी योजना केल्याने गावकरी स्वावलंबी बनले. विकासात्मक दृष्टी असणाऱ्या व्यक्तीकडे नेतृत्व दिल्यास गावचे नंदनवन कसे होते याचे पिराचीवाडी हे अप्रतिम उदाहरण असल्याचे सांगत मंत्री मुश्रीफ यांनी कौतुक केले.
कँप्शन
पिराचीवाडी, ता कागल येथे श्री हनुमान मंदिराच्या वास्तुशांती सोहळ्यात निघालेल्या या दिंडीत टाळमृदंगांच्या गजरात ग्रामस्थ व भाविक भक्तांसमवेत मंत्री मुश्रीफही सहभागी झाले.
(छाया-संदीप तारळे, गलगले)