‘वीर गाथा २.०’ राष्ट्रीय स्तर स्पर्धेत कोल्हापूरच्या फरहान मकानदारचे यश, संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 12:47 PM2023-01-28T12:47:50+5:302023-01-28T12:48:15+5:30
फरहानचे आज कोल्हापुरात जंगी स्वागत
कोल्हापूर : संरक्षण व शिक्षण मंत्रालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘वीर गाथा २.०’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी या गटांत फरहान मकानदारने यश संपादन केले. त्याला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते गौरविण्यात आले. फरहान आज, शनिवारी कोल्हापुरात येत असून, त्याचे जोरदार स्वागत केले जाणार आहे.
या स्पर्धेत देशभरातून १८ राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशातून २० लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामधून केवळ २५ विद्यार्थी ‘सुपर २५’ म्हणून निवडले गेले. महाराष्ट्रातून फरहान हा एकमेव विद्यार्थ्याची निवड झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्याला मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्याला नॅशनल साेसायटीचे अध्यक्ष हाजी असलम सय्यद व संचालक नासर खान यांचे मार्गदर्शन लाभले.
आज, सकाळी दहा वाजता दसरा चौकातून रॅलीला सुरुवात होणार असल्याची माहिती नॅशनल अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष हाजी असलम सय्यद व उपाध्यक्ष रहिद खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.