राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या सार्थक गायकवाडचे यश
By सचिन भोसले | Published: December 1, 2023 06:03 PM2023-12-01T18:03:03+5:302023-12-01T18:03:33+5:30
कोल्हापूर : नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या सार्थक गायकवाडने सोळा वर्षाखालील गटात सक्षम भन्साळीचा पराभव ...
कोल्हापूर : नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या सार्थक गायकवाडने सोळा वर्षाखालील गटात सक्षम भन्साळीचा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. यासह त्याने ुहेरीत अर्जुन परदेशीच्या साथीने दुहेरीचेही विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेतील निकाल असा, सार्थक गायकवाडने महाराष्ट्राच्याच अर्णव चावलाचा ६-२, ६-२ असा पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत त्याने महाराष्ट्राच्याच वैरण सुर्यवंशीचा ७-५, ६-१ असा पराभव करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या फेरीत. सार्थकने शिवराज भोसलेचा अटीतटीच्या लढतीत ७-६ (५), ६-२ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्याने आरुष जोशीचा ६-१, ६-२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत त्याने कडवी झुंज देत महाराष्ट्राच्याच सक्षम भन्साळीचा ७-६(६), ६-१ असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
दुहेरीत त्याने अर्जुन परदेशी याच्या साथीने पुण्याच्या समिहान देशमुख- सनत कडले यांचा ६-२, ६-४, ११-९ असा पराभव केला. तिसऱ्या फेरीत या जोडीने शिवराज भोसले -प्रत्युष ढेरे या जोडीचा ६-३, ६-१ असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत या जोडीने सक्ष्म भन्साळी- शार्दुल खवले या जोडीचा ७-५, ६-४ असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.