राज्यसेवा परीक्षेत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे यश; तन्मय मांढरे यांना दहावी, रोहित कुंभार यांना ४६वी रँक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 04:34 PM2024-09-28T16:34:45+5:302024-09-28T16:35:16+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत इचलकरंजी येथील तन्मय मांढरे यांनी दहावी तर ...
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत इचलकरंजी येथील तन्मय मांढरे यांनी दहावी तर कोल्हापूर, शाहूपुरी येथील रोहित कुंभार यांनी ४६ वी रँक मिळवली. या परीक्षेची प्राथमिक गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली.
रोहित यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण शाहुपुरीतील वि. स. खांडेकर प्रशाला येथे झाले. विवेकानंद कॉलेजमधून अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण करत त्यांनी पुणे येथील सीओईपी कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. त्यानंतर २०२३ मध्ये झालेली महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांनी ४६ वी रँक मिळवली. कुंभार यांचे वडील दिलीप कुंभार पोस्ट खात्यामध्ये लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांचा गणेशमूर्ती बनवण्याचा व्यवसाय असून, आई वैशाली हा व्यवसाय पाहतात.
तिसऱ्या प्रयत्नांत मिळविले यश
रोहित यांनी कोल्हापूर शहरातील खासगी अभ्यासिकेत रोज सात ते आठ तास अभ्यास केला. सेल्फ स्टडीवर भर व सराव प्रश्नपत्रिका सोडविल्यामुळे तिसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन केल्याचे त्यांनी सांगितले.