विमानतळ विकासाच्या पाठपुराव्याला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:39 AM2021-02-23T04:39:38+5:302021-02-23T04:39:38+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर-अहमदाबाद नवीन विमानसेवेला सोमवारपासून सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी म्हटले ...
कोल्हापूर : कोल्हापूर-अहमदाबाद नवीन विमानसेवेला सोमवारपासून सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे. नाईट लँडिंगबाबत शनिवारी बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर विमानतळ विकासासाठी २७५ कोटींचा प्रस्ताव मंजूर केल्यामुळेच तिरुपती, बंगलोर, हैदराबाद, मुंबई नंतर अहमदाबादही हवाई मार्गाने कोल्हापूरशी जोडले गेले. भारतीय विमान प्राधिकरणाचे महासंचालक व ऑपरेशन प्रमुखांशी नाईट लॅंडिंगबाबात चर्चा झाली आहे. केंद्राकडून नाईट लँडिंगसाठी प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. मात्र, राज्य शासनाकडून काही बाबींची पूर्तता होणे अद्याप बाकी आहे. यासाठी शनिवारी (दि. २७) महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे. लवकरच नाईट लँडिंगसह कार्गो हब, फ्लाईंग क्लब आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा कोल्हापूरमध्ये सुरू करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.