केळी विक्रेत्याच्या पोराने बांधले यशाचे तोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:21 AM2021-02-08T04:21:44+5:302021-02-08T04:21:44+5:30

कोल्हापूर : आईवडिलांच्या कष्टाचे चीज पोरांनी केले की वेगळंच समाधान चेहऱ्यावर झळकतं. डाेळ्यात लकाकी आणि अभिमानाने ऊर भरुन येतो, ...

Success pylons built by banana seller Pora | केळी विक्रेत्याच्या पोराने बांधले यशाचे तोरण

केळी विक्रेत्याच्या पोराने बांधले यशाचे तोरण

Next

कोल्हापूर : आईवडिलांच्या कष्टाचे चीज पोरांनी केले की वेगळंच समाधान चेहऱ्यावर झळकतं. डाेळ्यात लकाकी आणि अभिमानाने ऊर भरुन येतो, असाच काहीसा अनुभव कोल्हापुरातील चंद्रकांत आवटे घेत आहेत. स्वत: हातगाडीवर केळी विक्री करून संसाराचा गाडा चालवणाऱ्या आवटे यांचा मुलगा अवधूत सीए परीक्षा उत्तीर्ण झाला आणि तीस वर्षांचे कष्ट सार्थकी लागले. आईवडिलांनी पाठबळ दिले, पोरांनीही कष्टाची जाणीव ठेवली तर यशोशिखर गाठण्यापासून कोणी रोखू शकत नाही, हेच यातून अधोरेखित झाले.

अवधूत चंद्रकांत आवटे हा २३८ गुणांसह सीए परीक्षा उत्तीर्ण झाला आणि शिवाजी पेठेतील आयरेकर गल्लीतील त्यांच्या घराला यशाचे तोरण बांधले गेले. यानिमित्ताने जीवनपटाची मागील पाने उलगडली असता, कष्टाला पाठबळाची जोड मिळाली की जीवनात काय घडू शकते त्याचे मूर्तिमंत उदाहरण समोर येते. आईवडिलांनी स्वत: कष्ट करून शिकण्यासाठी दिलेला पाठींबा, भाऊ बसवराज याने दाखविलेली दिशा आणि शिक्षक प्रशांत देशपांडे यांचे मार्गदर्शन यांचा त्रिवेणी संगम घडून आला आणि अवधूतने एकेक यशोेशिखर गाठण्यास सुरुवात केली. बीकॉमला कॉमर्स कॉलेजमध्ये तो पहिला आला तर एमकॉमला विद्यापीठात पहिलाच आला. पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षा उत्तीर्ण झाला.

पण हे यश इतके सोपे नव्हते, असा स्वत: अवधूत सांगतो. वडील आणि भावाने दिलेले पाठबळ माझ्यासाठी खूप कांही होते, असे तो सांगतो.

चौकट ०१

३० वर्षांपासून केळी विक्री

चंद्रकांत आवटे यांचा ताराबाई रोडवर केळी विक्रीचा गाडा आहे. गेली ३० वर्षे ते हा व्यवसाय करतात. सकाळी ४ वाजता त्यांचा दिनक्रम सुरू होतो. सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत ते रस्त्यावर केळी विकत असतात. पण हे करत असताना, त्यांनी मुलांना कधी केळी विकायला बसविले नाही. स्वत:चे शिक्षण १२ वी झाले, पुढे शिकता आले नाही, निदान पोरांनी शिकावे म्हणून ते धडपडत राहीले. पोटापाण्यासाठी चिकोडी तालुक्यातील नंदी गावातून ते कोल्हापुरात आले. मी दिवसरात्र राबेन पण तुम्ही खूप शिका, मोठे व्हा असा त्यांचा कायमच आग्रह राहिला. मोठा मुलगा एमकॉम होऊन एका फर्ममध्ये काम करू लागला. घर खर्चाचा भार कांहीसा हलका झाला तरीही अजून ते केळी विकतात.

फोटो ०७०२२०२१-कोल-आवटे

फोटो ओळ : सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अवधूतचे वडील चंद्रकांत आवटे हे ताराबाई रोडवर केळी विक्री करतात.

Web Title: Success pylons built by banana seller Pora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.