गगनबावड्यात काेरोनाला रोखण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:24 AM2021-04-06T04:24:31+5:302021-04-06T04:24:31+5:30

तहसीलदार यांच्या सूचना, आदेशानुसार गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व पोलीस पाटील यांच्या सहकार्याने बाहेरून आलेल्या सर्व गावातील नोकरदार व्यक्तींची ...

Success in stopping Carona in Gaganbawda | गगनबावड्यात काेरोनाला रोखण्यात यश

गगनबावड्यात काेरोनाला रोखण्यात यश

Next

तहसीलदार यांच्या सूचना, आदेशानुसार गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व पोलीस पाटील यांच्या सहकार्याने बाहेरून आलेल्या सर्व गावातील नोकरदार व्यक्तींची अँटिजन टेस्ट करून त्यांना विलीगिकरण कशात काही दिवस ठेवण्यात आले, त्याकरिता गावातील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या ताब्यात घेण्यात आल्या. गावात ॲक्टिव्ह रुग्ण सापडल्यावर , त्या गावात ७-८ दिवस गाव सील करण्यात येईल. गावातील उत्सव , समारंभ, मेळावे , सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम ,लग्न कार्य व निधन घटना यावरती निर्बंध आणले गेले व कार्यक्रमास मोजकीच उपस्थिती राखण्यात आली.

योग्य उपाय योजना करून, नियमांचे कठोर पालन केले गेले.

गगनबावडा तालुक्यामध्ये २०२० मे महिन्यात पाहिले 6 कोविड रुग्ण सापडले. जून मध्ये १ , जुलै महिन्यात ६ , तर ऑगस्टमध्ये हा आकडा ४१ वर गेला . सप्टेंबर मध्ये सर्वाधिक 53 ॲक्टिव्ह रुग्ण सापडले गेलेत .

ऑक्टोबरमध्ये १४ नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रत्येकी ४ -४ रुग्ण सापडलेत. २०२१ मध्ये फेब्रुवारी महिन्यात ३ तर मार्च मध्ये २ ऍक्टिव्ह रुग्ण सापडलेत. गगनबावडा तालुकारोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती गगनबावडा यांच्या अहवालानुसार मार्च अखेर १३४ कोविड रुग्णांची नोंद झाली असून, आज अखेरीस कोणताही नवीन रुग्ण गगनबावडा तालुक्यात सापडलेले नाहीत. तरीही खबरदारी चा उपाय म्हणून सर्वतोपरी तयारी केली गेली आहे.

तहसीलदार संगमेश कोडे

Web Title: Success in stopping Carona in Gaganbawda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.