डेक्कन अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत सुरेश चेचरचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:44 AM2021-02-18T04:44:58+5:302021-02-18T04:44:58+5:30

महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असलेल्या कळसूबाई याठिकाणी या स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर अलंगगड, मदनगड व कुलंगगड, रतनगड, अशा अतिशय ...

Success of Suresh Checher in Deccan Ultra Marathon | डेक्कन अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत सुरेश चेचरचे यश

डेक्कन अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत सुरेश चेचरचे यश

Next

महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असलेल्या कळसूबाई याठिकाणी या स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर अलंगगड, मदनगड व कुलंगगड, रतनगड, अशा अतिशय अवघड कडेकपारीतून कधी तीव्र उतार, खडकाळ वाट, निसरडा रस्ता याद्वारे घनदाट जंगलातून आगेकूच करत ३,५६० मीटर उंचीवरून हा खडतर असलेलाा स्पर्धेचा मार्ग होता. १२ ते १४ फेब्रुवारीदरम्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ८० किलोमीटरच्या या स्पर्धेत २० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेत स्पर्धक सहभागी झाले होते. एकही चूक ही स्पर्धकाच्या जिवावर बेतणारी होती.

अशा कठीण स्पर्धेत कोल्हापूरच्या स्पर्धकांनी यश मिळवले व सुरेश चेचर यांनी द्वितीय क्रमांक मिळवल्याने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या चारही स्पर्धकांना प्रशिक्षक आश्विन भोसले व डालमिया शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड, शुगर युनिट, दत्त आसुर्ले-पोर्ले यांचे सहकार्य मिळाले. या स्पर्धेनंतर लेह-लडाख मॅरेथॉन स्पर्धेच्या तयारी चौघे जण करत आहेत.

Web Title: Success of Suresh Checher in Deccan Ultra Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.