वासंतीदेवी पाटील फार्मसी कॉलेजचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:23 AM2021-04-15T04:23:05+5:302021-04-15T04:23:05+5:30
कोडोली : शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कोडोली, ता. पन्हाळा येथील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वासंतीदेवी पाटील ...
कोडोली : शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कोडोली, ता. पन्हाळा येथील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजमधील चार मुलींनी विद्यापीठ गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. विद्यापीठाच्या गुणवता यादीमध्ये चारही मुलींचा समावेश झाल्याने महाविद्यालयाच्यावतीने त्यांचे अभिनंदन व सत्कार करून कौतुक करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठांतर्गत तीन जिल्ह्यांतील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातून ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालाच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकाविलेल्या मुली अशा : प्रथम वर्षामधून साक्षी खुडे ८५.७९ % दुसरी, अवंतिका खोत ८३.८६ % ८ वी, तसेच दि्वतीय वर्षातून सोनिया चव्हाण ८२.९३ % ७ वी आणि तृतीय वर्षातून नंदिनी पवार ८३.५४ % ९ वी यांचा समावेश आहे. या विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या यशाची परंपरा जपतच विद्यापीठाच्या शिष्यवृत्ती यादीत स्थान मिळविले.
या सर्व विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष पायघन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे सचिव मा. डॉ. जयंत पाटील आणि विश्वस्त मा. विनिता पाटील यांनी गुणवंत विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.