बर्फानी आच्छादलेला पर्वत ; कोल्हापूरच्या युवकांचा ‘केदारकंठा’ ट्रेक यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 05:49 PM2020-01-30T17:49:05+5:302020-01-30T17:49:55+5:30
उत्तराखंड मधील ‘केदारकंठा’ हा ट्रेक नेहमीच सर्व गियार्रोहकांना खुणावतो. गियार्रोहणातील जोखीम हि मोठी असते पण निसर्गाच्या आव्हानातील धोके पत्करून मार्गक्रमण करणे हे धाडसाचे असते. कोडगाव येथून या ट्रेकची सुरवात झाली. पाठीवर १० किलो विजांचे साहित्य घेऊन हा ट्रेक सुरु झाला . प्रवासातला संपूर्ण रस्ता हा खडी चढण आहे.
कोल्हापूर : सर्वत्र बर्फांनी आच्छादलेले पर्वत, प्रतिकल परिस्तिथीत खडी चढण आणि रक्त गोठवणारी थंडी अशा परिस्थितीत कोल्हापुरातील पाच तरुणांनी उत्तराखंड येथील बारा हजार पाचशे फूट उंचचा केदारकंठा ट्रेक यशस्वी पार केला. क्षितिज नित्यानंद, प्रियांका फडणीस, विक्रांत देसाई, प्रसाद तिरकापडी, चैत्यन यळगूडकर हे पाच जण नुकतेच हा ट्रेक करून कोल्हापूरमध्ये परतले. इंडीया हाईक्स या ट्रेकिंग संस्थेतर्फे या मोहिमेचे आयोजन केले होते.
उत्तराखंड मधील ‘केदारकंठा’ हा ट्रेक नेहमीच सर्व गियार्रोहकांना खुणावतो. गियार्रोहणातील जोखीम हि मोठी असते पण निसर्गाच्या आव्हानातील धोके पत्करून मार्गक्रमण करणे हे धाडसाचे असते. कोडगाव येथून या ट्रेकची सुरवात झाली. पाठीवर १० किलो विजांचे साहित्य घेऊन हा ट्रेक सुरु झाला . प्रवासातला संपूर्ण रस्ता हा खडी चढण आहे. दिवसातील सलग चार तास चढण केली जाते. गिर्यारोहकांसमोर एकूण बारा हजार पाचशे फूट उंचीवर चढाई करण्याचे आव्हान होते. अनेक अडचणींना सामोरे जात हे आव्हान त्यांनी पूर्ण केले. आॅक्सिजनचा अपुरा पुरवठा, जोरदार बर्फवृष्टी अशा नैसर्गिक अडचणींना सामोरे जावे लागले. रात्रीच्या वेळी टेन्ट पूर्ण बर्फानी आच्छादून जात असे अशावेळी कसोटीचा क्षण येत, असे रात्रीच्या वेळी उणे दहा अंश सेल्सिअस तापमान होते आणि दिवसा १ डिग्री सेल्सिअसतापमान असायचे. संपूर्ण चढाईच्या वेळी ३ फूट बर्कातून प्रवास चालू होता. शेवटच्या टप्प्यावर आलेल्या अतिशय प्रतिकूल परीस्तीवर मत करून २० गियार्रोहकांनी हा ट्रेक पूर्ण केला. या ट्रेकमध्ये कोल्हापूरातील पाच युवकांपैकी एका तरुणीचाही समावेश होता.
हा माझा तिसरा ट्रेक
या ट्रेकनंतर माझा आत्मविश्वास वाढला आहे. हिमालयातील आणखी शिखरे पादाक्रांत करण्याचा माझा मानस आहे. गियार्रोहणामुळे शारीरिक क्षमताबरोबरच मानसिक क्षमताही वाढते. दैनंदिन आयुष्यातही याचा फायदा होतो अशी प्रतिक्रीया पियंका फडणीस यांनी ट्रेक पूर्णत्वानंतर व्यक्त केली.