कोईमतूर येथील काररेस स्पर्धेत ध्रुव मोहिते याची यशस्वी कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:24 AM2021-02-10T04:24:40+5:302021-02-10T04:24:40+5:30
कोल्हापूर : येथील काररेसर ध्रुव मोहिते याने कोईमतूर येथे दि. ६ आणि ७ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या केएमएस ५० साहसी ...
कोल्हापूर : येथील काररेसर ध्रुव मोहिते याने कोईमतूर येथे दि. ६ आणि ७ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या केएमएस ५० साहसी काररेस स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली. मोटर स्पीडवे येथे झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सत्राच्या शेवटी दुहेरी यश मिळवून त्याने यशस्वी सुरुवात केली. त्याने दोन्ही रेसमध्ये अनेक चढ-उतार अनुभवत दि्वतीय क्रमांकावर राहून स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
पहिल्या रेसमध्ये सुरुवातीच्या आघाडीत घसरल्यानंतर देखील ध्रुुव आणि संघ सहकारी अनिंदीथ हे पाचव्या लॅपपर्यंत बरोबरीत होते. परंतु, कॉर्नरमध्ये झालेल्या ब्रेकफेलमुळे ध्रुव हा मागे राहून देखील त्याने प्रयत्न करून स्पर्धा दि्तीय क्रमांकाने यशस्वीरित्या पूर्ण केली. दहाव्या लॅपमध्ये ध्रुवच्या कारच्या डाव्या बाजूचा पुढचा टायर पंक्चर झाल्याने तो बदलण्यासाठी पिटस्टॉप घ्यावा लागला. या अडचणीमुळे स्पर्धेत मागे राहिलेल्या ध्रुव याने पुन्हा यशस्वी चढाई करून सुस्थिती मिळविली. त्यामुळे फोक्सवॅगन मोटरस्पोर्ट इंडियाने रेस एक आणि दोनमध्ये प्रथम आणि दि्वतीय स्थान पटकविले.
चौकट
साहसी प्रकार
दुसऱ्या रेसमध्ये केएमएस ५० हा एक साहसी प्रकार असून त्यामध्ये एक अनिवार्य पिट स्टॉप आणि ड्रायव्हिंगचा एकूण वेळ १ तास ३० मिनिटे किंवा १२५ किलोमीटर असा असतो.
फोटो (०९०२२०२१-कोल-ध्रुव मोहिते (काररेस)