यशस्वी संशोधनाचे उत्तम सादरीकरण आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:23 AM2021-03-19T04:23:34+5:302021-03-19T04:23:34+5:30
कसबा बावडा : वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन व सादरीकरण कौशल्ये आत्मसात असणे अत्यंत आवश्यक आहे. ...
कसबा बावडा : वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन व सादरीकरण कौशल्ये आत्मसात असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सादरीकरणाच्या माध्यमातूनच आपले संशोधन जगासमोर येऊ शकते, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल यांनी केले. पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संशोधन व प्रशिक्षण कार्यशाळेच्या (कोर्ट-२०२१) उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी संशोधन व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली जाते. यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर महिनाभर उशिरा १८ मार्च रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे झालेल्या या कार्यशाळेचे कुलगुरू राकेशकुमार मुदगल यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करून उद्घाटन झाले.
यावेळी प्र कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, उपप्राचार्या डॉ. आशालता पाटील, संशोधन संचालक डॉ. सी. डी. लोखंडे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुहासिनी राठोड, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, कोर्ट २०२१चे सचिव डॉ. बी. सी. पाटील यांच्यासह प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल व अधिष्ठाता डॉ. राकेशकुमार शर्मा यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपक्रमाला विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
फोटो आहे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्या 'कोर्ट-२०२१' उपक्रमात मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा सोबत अन्य मान्यवर.