यशस्वी संशोधनासाठी उत्तम सादरीकरण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:22 AM2021-03-20T04:22:11+5:302021-03-20T04:22:11+5:30

कसबा बावडा : वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन व सादरीकरण कौशल्ये आत्मसात असणे अत्यंत आवश्यक ...

Successful research requires good presentation | यशस्वी संशोधनासाठी उत्तम सादरीकरण गरजेचे

यशस्वी संशोधनासाठी उत्तम सादरीकरण गरजेचे

Next

कसबा बावडा : वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन व सादरीकरण कौशल्ये आत्मसात असणे अत्यंत आवश्यक असून, उत्तम सादरीकरणाच्या माध्यमातूनच आपले संशोधन जगासमोर येऊ शकते, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल यांनी केले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे आयोजित पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संशोधन व प्रशिक्षण कार्यशाळेच्या (कोर्ट-२०२१) उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी प्र. कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, उपप्राचार्या डॉ. आशालता पाटील, संशोधन संचालक डॉ. सी. डी. लोखंडे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुहासिनी राठोड, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, कोर्ट २०२१चे सचिव डॉ. बी. सी. पाटील उपस्थित होते.

फोटो: १९ डीवायपी

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘कोर्ट-२०२१’ उपक्रमात मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा.

Web Title: Successful research requires good presentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.