कोविड रुग्णांवर मॉडर्न होमिओपॅथीमध्ये यशस्वी उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:24+5:302021-06-05T04:17:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ऑक्सिजन, व्हेंटिलेटरशिवाय चौदा दिवसांच्या होमिओपॅथीच्या उपचारानंतर कोविड रुग्ण पूर्ण बरा झाला आहे. येथील मॉडर्न ...

Successful treatment in Kovid patients in modern homeopathy | कोविड रुग्णांवर मॉडर्न होमिओपॅथीमध्ये यशस्वी उपचार

कोविड रुग्णांवर मॉडर्न होमिओपॅथीमध्ये यशस्वी उपचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ऑक्सिजन, व्हेंटिलेटरशिवाय चौदा दिवसांच्या होमिओपॅथीच्या उपचारानंतर कोविड रुग्ण पूर्ण बरा झाला आहे. येथील मॉडर्न होमिओपॅथिमध्ये दिलशाद मज्जिद जमादार (वय ६५, रा. साईक्स स्टेंशन कोल्हापूर) यांना हा अनुभव आला आहे. त्यांनी स्वत:च व्हिडीओ करून त्याची माहिती दिली आहे. चौदा दिवस शंभर टक्के होमिओपॅथीने उपचार केले व मुजावर यांचा कोरोना बरा झाला असल्याचे डॉ. विजयकुमार माने यांनी सांगितले.

घडले ते असे : श्रीमती जमादार यांना २८ एप्रिलला अंगदुखीचा त्रास व व ताप आला. त्यांनी फॅमिली डॉक्टरांकडे इंजेक्शन, गोळ्या घेतल्या पण त्याने काहीच फरक जाणवला नाही. दुसऱ्यादिवशी तज्ज्ञ ॲलोपॅथी डॉक्टरला त्यांनी दाखविले. त्यांनी एचआरसीटी चाचणी करण्याची सूचना केली. ३ मे रोजी ही चाचणी केल्यावर त्यांचा स्कोर १९/४० असा आला. मुजावर यांना जेवण जात नव्हते, ताप जास्त होता व त्यांचे ऑक्सिजन प्रमाण ८०-८१ टक्क्यापर्यंत कमी झाले होते. ५ मे रोजी त्यांचा त्रास आणखी वाढला. एचआरसीटी स्कोर वाढून २३/४० झालेला दिसला. रुग्णाचे ऑक्सिजन प्रमाण ७०-७१ टक्क्यापर्यंत खाली आले. त्यानंतर त्यांच्यावर मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले. प्रत्येकी अर्ध्या तासाने एक चमचा या प्रकारे औषध देण्यात आले. त्यांची ऑक्सिजन पातळी ७० टक्के असल्याने घरीच त्यांना पाच लिटर ऑक्सिजन देण्यात आला. उपचारांच्या चौथ्या दिवशी ऑक्सिजन पातळी ९४ टक्क्यापर्यंत सुधारली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान त्यांना अॅलोपॅथीची एकही गोळी दिली नाही व कोणत्याही प्रकारच्या अँटिव्हायरलस, अँटिबायोटिक्स काही दिले नाही. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये यशस्वी उपचारांमुळे या महिला कोणत्याही प्रकारच्या व्हेंटिलेटरशिवाय कोरोनातून पूर्ण बऱ्या झाल्या.

फोटो : ०४०६२०२१कोल-दिलशाद मुजावर-मॉडर्न

Web Title: Successful treatment in Kovid patients in modern homeopathy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.