अशी ही भारतातील न्यायाची तऱ्हा

By admin | Published: May 14, 2015 11:38 PM2015-05-14T23:38:51+5:302015-05-14T23:38:51+5:30

सलमान खान आणि जयललिता यांच्या प्रकरणांनंतर दाऊद इब्राहीम यानं भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आहे; कारण देशातील उत्तम वकील नेमण्याएवढा

Such is the judgment of justice in India | अशी ही भारतातील न्यायाची तऱ्हा

अशी ही भारतातील न्यायाची तऱ्हा

Next

नरेंद्र रानडे - सांगली दिवसेंदिवस होत चाललेल्या गतिमान आयुष्यामुळे कित्येकांना स्वत:कडे लक्ष देण्यासही वेळ मिळत नाही. ‘मी आणि माझे’ हेच अनेकांचे भावविश्व बनल्याने विभक्त कुटुंबपध्दती अंगवळणी पडत चालली आहे. तरीही काहीजण एकत्र कुटुंब पध्दतीची संकल्पना प्रत्यक्षात जोपासत आहेत, तर दुसरीकडे विभक्त कुटुंबांमधील घटस्फोट, कौटुंबिक वादविवाद, नातेसंबंधात दुरावा यातही वाढ झाली आहे. वृध्द व्यक्ती अनेकांना ‘ओझे’ वाटत असल्याने कुपवाडच्या वृध्दाश्रमात प्रतीक्षा यादी लागली आहे. हे चित्र म्हणजे कौटुंबिक नातेसंबंधातील रेशीमबंध सैल होत चालल्याचे निदर्शक आहे.
पूर्वीची वाडा संस्कृती अपार्टमेंटच्या जगात कालबाह्य झाली. साहजिकच एकत्र कुटुंबपध्दती लोप पावत चालली आहे. एकाच कुटुंबात १० ते १२ जण एकत्रित रहात असल्याचे चित्रही दिसेनासे झाले असून, सध्या बहुतांशी चौकोनी अथवा षटकोनी कुटुंबांची संख्या वाढत आहे. गेल्या काही वर्षातील आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच अशा वाढत्या मर्यादित कुटुंबांच्या गर्दीतही जिल्ह्यात एकत्रित कुटुंबपद्धतीने राहणारे लोकही दिसून येत आहेत.


पन्नासजणांचे एकत्रित कुटुंब
प्रथमपासून आमच्या घरी एकत्र कुटुंब व्यवस्थेचे वातावरण होते. सध्या आमचा ५० जणांचा परिवार आहे. एकत्रित असल्यामुळे एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होता येते. मुख्य म्हणजे अनुभवी वयोवृध्द माणसांकडून मुलांवर लहानपणीच संस्कार होतात. याचा त्यांना जीवनाच्या पुढील वाटचालीत उपयोग होतो, असे वाळव्यातील निवृत्त माध्यमिक शिक्षक शिवाजी कदम यांनी सांगितले.



२६ जणांचा परिवार
सांगलीतील रामविश्वास दूध केंद्राचे चालक विवेक गवळी म्हणाले की, एकत्र कुटुंब पध्दती ही संकल्पना सर्वांनी स्वीकारली पाहिजे. सध्या आम्ही कुटुंबातील २६ जण एकत्रित राहतो. यामुळे आमच्यातील संवादात भर पडली आहे. जेवण, टीव्ही पाहणे आम्ही एकत्रितच करतो. महागाई वाढत असली तरी, एकत्र कुटुंब पध्दतीमुळे त्याचा भार आमच्यावर पडत नाही.

कौटुंबिक कलहातही होत आहे वाढ....
कौटुंबिक कलहातही वाढ होत आहे. शहरात असलेल्या महिला व मुले सहाय्य कक्षात महिन्याला कौटुंबिक वादविवादाच्या ३५ ते ४० तक्रारी येत आहेत. तीच परिस्थिती पोलीस मुख्यालयातील महिला कक्षातील तक्रारींची आहे. जिल्हा न्यायालयात वर्षाला सरासरी ५५० घटस्फोटाची प्रकरणे प्रविष्ट होत असून, यामध्ये लग्न झाल्यानंतर एक ते दोन वर्षात घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

एकत्र कुटुंबपध्दती दुर्मीळ होत चालल्याने व घरात मार्गदर्शन करणाऱ्यांची उणीव जाणवत असल्याने घरातील वाद मिटविण्यासाठी काहीजण आमच्याकडे येतात. प्रामुख्याने सासू-सुनेमधील भांडण, कौटुंबिक हिंसाचार आदी प्रकरणांचा यामध्ये समावेश असतो. दिवसागणिक तक्रारींमध्ये वाढ होत आहे.
- राधिका सावंत आणि दत्तात्रय कोळी, समुपदेशक, महिला व मुले सहाय्य कक्ष, सांगली


विभक्त कुटुंब पध्दतीमुळे आजी-आजोबांचा मायेचा आधार गेला आहे. सध्या टीव्ही, फेसबुक, व्हॉटस्-अ‍ॅप या माध्यमातून एकतर्फी, निरर्थक देवाण-घेवाण सुरू आहे. आमच्याकडे येणारी बहुतांशी प्रकरणे पती-पत्नीमधील विसंवाद, पालक आणि पाल्यामधील वाढता दुरावा तसेच नवविवाहितांमधील वाढत्या घटस्फोटाची असतात.
- डॉ. प्रदीप पाटील, मानसोपचार तज्ज्ञ, सांगली.

घाई-गडबडीत आणि एकमेकांना पसंत नसतानादेखील लग्नाच्या बंधनात अडकल्याने वधू-वरांचे थोड्याच कालावधित एकमेकांशी पटत नाही. परिणामी विसंवाद, गैरसमज यामुळे काही महिन्यातच न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याकडे कल वाढत चालला आहे. कुटुंब व्यवस्था डळमळीत झाल्याचेच हे लक्षण आहे.
- अ‍ॅड. अमित शिंदे, सांगली.

Web Title: Such is the judgment of justice in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.