नांदणीचा सुधीर पाटील एमपीएससीत राज्यात दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:54 AM2018-05-31T00:54:26+5:302018-05-31T00:54:26+5:30

Sudhir Patil MP from Nandani is the second in MPSc | नांदणीचा सुधीर पाटील एमपीएससीत राज्यात दुसरा

नांदणीचा सुधीर पाटील एमपीएससीत राज्यात दुसरा

googlenewsNext

पुणे/कोल्हापूर : महाराष्ट लोकसेवा आयोगातर्फे सप्टेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत जळगावचा व सध्या पुण्यात राहत असलेला रोहितकुमार राजपूत पहिला, तर नांदणीचा सुधीर पाटील दुसरा आला आहे. मागासवर्गीयांमधून सोलापूर जिल्ह्यातील अजयकुमार नष्टे, तर मुलींमधून पुणे जिल्ह्यातील रोहिणी नऱ्हे प्रथम आली.

उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आदी ३७७ जागांसाठी परीक्षा झाली होती. १ लाख ९८ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली होती. मुख्य परीक्षेसाठी ४ हजार ८३९ विद्यार्थी पात्र ठरले. त्यातून मुलाखतीसाठी ११९४ उमेदवार निवडले गेले. रोहितकुमार ५९९ गुण
मिळवून प्रथम तर कोल्हापूरचा सुधीर पाटील ५७२ गुणांसह दुसरा, सोपान टोम्पे ५७१ गुणांसह तिसरा, अजयकुमार नष्टे ५७० गुणांसह खुल्या गटातून चौथा तर मागासवर्गीयांमधून प्रथम, दत्तू शेवाळे ५६६ गुणांसह पाचवा आला आहे.

प्रमोद कुडले, अविनाश कोरडे, सुशांत शिंदे, प्रसेनजीत प्रधान, रोहिणी नºहे, पूजा पाटील, पीयूष चिंचवडे, अमृता साबळे, नूतन खाडे आदी विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत.राज्यसेवा परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.ज्या उमेदवारांची निवड झाली नाही, त्यांना उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास त्यांची गुणपत्रके प्रोफाइलमध्ये अपलोड झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावेत अशी सूचना आयोगाकडून करण्यात आली आहे.

सुधीर पाटील दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी
उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात दुसरे आलेले सुधीर पाटील हे नांदणी (ता. शिरोळ) येथील आहेत. दुसºया प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ेशेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुधीर यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण नांदणी हायस्कूलमध्ये झाले. इस्लामपूर येथील राजारामबापू इस्टिट्युट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी येथून बी. टेक मॅकॅनिकल झाल्यानंतर नरके फाऊंडेशन अ‍ॅकॅडमीमधून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. २०१५ मध्ये राज्यसेवा परीक्षेचा पहिल्या प्रयत्नात त्यांची विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली होती. मात्र, त्यावर समाधान न मानता २०१७ मध्ये उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा त्यांनी दिली. आणि त्यात यश मिळविले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासन सेवेत जाण्याची आपली इच्छा असल्याचे सुधीर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दररोज १० ते १२ तास अभ्यास केला. स्वत:मधील क्षमता ओळखून अभ्यासात झोकून दिल्यास यश निश्चित मिळते, असेही ते म्हणाले.
 

स्पर्धा परीक्षा हे प्रचंड वैविधता असणारे क्षेत्र आहे. त्यातून समाजासाठी योगदान देता येते. त्यामुळे मी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात सर्वसामान्य कुटुंंबात माझा जन्म झाला. माझे आई व वडील दोघेही फोटोग्राफीचा व्यवसाय करतात. आई -वडिलांसह माझे मोठे बंधू व वहिनी यांचा मला पाठिंबा मिळाला.
- रोहितकुमार राजपूत

Web Title: Sudhir Patil MP from Nandani is the second in MPSc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.