कोल्हापुरात पुरेशा प्रमाणात मीठाचा साठा
By admin | Published: November 12, 2016 06:45 PM2016-11-12T18:45:33+5:302016-11-12T18:45:33+5:30
मुंबईसह अन्य काही ठिकाणी मिठाचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याची अफवा पसरल्याने किलोला चारशे रुपये इतका भाव मिळाल्याची चर्चा शनिवारी सकाळपासून सर्वत्र होती.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १२ - उत्तर प्रदेश, मुंबईसह अन्य काही ठिकाणी मिठाचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याची अफवा पसरल्याने किलोला चारशे रुपये इतका भाव मिळाल्याची चर्चा शनिवारी सकाळपासून सर्वत्र होती. कोल्हापुरात अशी कोणतीच परिस्थिती नसून, मिठाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्थानिक व्यापाºयानी सांगितले.
शुक्रवारी रात्री वृत्तवाहिन्यांवर मिठाचा तुटवडा असल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. त्यामुळे कोल्हापुरातही मिठाचा पुरेसा साठा व दरही कसे आहेत, याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली. अनेकांनी थेट मिळेल त्या दुकानातून मीठ खरेदी करण्याचा सपाटाही लावला होता. मात्र, व्यापाºयांनी अशी कुठलीही परिस्थिती कोल्हापुरात नसल्याचे नागरिकांना समजावून सांगितल्याने खरेदी थांबली.
कोल्हापुरात लहान, मोठे आणि मध्यम असे मीठ कच्छ (गुजरात), मुंबई, मद्रास येथील मिठागरांतून येते. यात सुट्टे, बारीक मीठही विविध कंपन्यांच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होते. कोल्हापूरला घरगुती वापरासाठी सुमारे १४00 टन तर औद्योगिक वापरासाठी सुमारे चार ते पाच हचार टन इतके मीठ लागते. जगात २१ कोटी टनांचे एकूण मीठ उत्पादित केले जाते. भारताचा मीठ उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो. सुमारे दहा लाख टन मीठ निर्यात केले जाते. मिठासाठी साधारणपणे गुजरात, कच्छ, वाघा बॉर्डर, चेन्नई किनारपट्टी, तसेच महाराष्ट्रातील वसई, नालासोपारा, भार्इंदर, पालघर, अलिबागचा काही भाग येथे मीठ तयार केले जाते. टाटासह मोठ्या कंपन्यांही रिपॅकिंग प्रक्रिया करून हे मीठ विक्रीसाठी देशभरात उपलब्ध करुन देतात. कोल्हापूरात मिठाचा दर ६ ते ३० रुपये प्रतिकिलो आहे.
सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात मीठ उपलब्ध आहे. त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफवांना बळू पडू नये. किरकोळ व्यापा-यांनी आगावू मीठही खरेदी करू नये. त्याचा परिणाम म्हणून तुटवडा जाणवू शकतो. मीठाचे दरही पूर्वीप्रमाणेच आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरून मोठ्या प्रमाणात मीठ खरेदी करू नये.
- विजय कोल्हापुरे, मीठ व्यापारी, कोल्हापूर.