साखर वाढली, मिरची उतरली आठवडी बाजारभाव : सुके खोबरे, आल्याचे दर वाढले; भाजीपाल्यांची कमी आवक

By admin | Published: May 12, 2014 12:34 AM2014-05-12T00:34:14+5:302014-05-12T00:34:14+5:30

कोल्हापूर : साखर, सुके खोबरे व आल्याच्या दरांत या आठवड्यात प्रचंड वाढ झाली, तर इतर वस्तूंचे दर ‘जैसे थे’ होते. दुसरीकडे पालेभाज्या,

Sugar increased, Chilli dropped; Weekly Quote: dried coconut, increase in rates; Vegetables less inward | साखर वाढली, मिरची उतरली आठवडी बाजारभाव : सुके खोबरे, आल्याचे दर वाढले; भाजीपाल्यांची कमी आवक

साखर वाढली, मिरची उतरली आठवडी बाजारभाव : सुके खोबरे, आल्याचे दर वाढले; भाजीपाल्यांची कमी आवक

Next

कोल्हापूर : साखर, सुके खोबरे व आल्याच्या दरांत या आठवड्यात प्रचंड वाढ झाली, तर इतर वस्तूंचे दर ‘जैसे थे’ होते. दुसरीकडे पालेभाज्या, फळभाज्या, धान्याच्या दरांत किंचितशी वाढ झाली आहे. त्याचबरोबर आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यावर असल्याने रत्नागिरी हापूसचा दर ३०० रुपयांवरून ३५० रुपये इतका, तर देवगड २५० रुपयांवरून ३०० रुपये झाला. दरम्यान, रविवारी (दि. ११) शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी तुरळक प्रमाणात गर्दी दिसून येत होती. शहरातील कपिलतीर्थ मार्केट, लक्ष्मीपुरीसह शाहूपुरी पाच बंगला, राजारामपुरी (नार्वेकर मार्केट), गंगावेश परिसरातील पाडळकर व शाहू उद्यान येथील बाजारात सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत ग्राहकांची खरेदीसाठी तुरळक गर्दी होती. कडक उन्हामुळे सायंकाळी सहानंतर खरेदीसाठी ग्राहकांची जास्त गर्दी होती. या आठवड्यात झालेल्या पावसाचा परिणामही बाजारपेठेवर झाला. या पावसामुळे काही भाजीपाला व फळभाज्यांची आवक कमी होती. त्यामुळे भाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. त्याचबरोबर साखर, खोबरे तसेच रत्नागिरी हापूस, देवगड आंबा, कोथिंबीर व लिंबूला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. (प्रतिनिधी)

Web Title: Sugar increased, Chilli dropped; Weekly Quote: dried coconut, increase in rates; Vegetables less inward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.