साखरेने गाठली नीचांकी, दर २७०० रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:26 AM2018-04-11T05:26:39+5:302018-04-11T05:26:39+5:30

घाऊक बाजारातील साखरेच्या दरातील घसरण चालूच असून, मंगळवारी २७०० रुपये प्रतिक्विंटल असे दर होते. गेल्या दीड वर्षातील हा दराचा नीचांक आहे.

Sugar reached below, at Rs 2700 per quintal | साखरेने गाठली नीचांकी, दर २७०० रुपयांवर

साखरेने गाठली नीचांकी, दर २७०० रुपयांवर

Next

- चंद्रकांत कित्तुरे 
कोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेच्या दरातील घसरण चालूच असून, मंगळवारी २७०० रुपये प्रतिक्विंटल असे दर होते. गेल्या दीड वर्षातील हा दराचा नीचांक आहे. यामुळे साखर कारखान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनेही निर्यात साखरेवर शेतकऱ्यांना प्रतिटन ५५ रुपये अनुदान देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
देशात यंदा २९५ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा
अंदाज आहे. देशांतर्गत मागणीपेक्षा ते सुमारे ४५ लाख टन जादा आहे. या अतिरिक्त साखरेच्या दबावामुळे हंगामाच्या सुरुवातीला घाऊक बाजारातील दर ३५०० रुपये प्रतिक्विंटल होता. आता तो आजघडीला २७०० रुपयांवर आला आहे. साखरेचे दर वाढावेत यासाठी केंद्र सरकारनेही साखरेवरील आयात कर १०० टक्के केला आहे. तसेच साखर कारखान्यांना २० लाख
टन साखर निर्यातीची परवानगी
दिली आहे. तथापि, आंतरराष्टÑीय बाजारातील साखरेचे दरही कोसळलेले आहेत. मंगळवारी निर्यातीचे दर २००० ते २०५० रुपये प्रतिक्विंटल होते. या दराने कारखान्यांना साखर निर्यात करणे तोट्याचे आहे.
>साखर मूल्यांकन २८०० रुपयांवर
दरातील घसरणीमुळे राज्य सहकारी बॅँकेनेही गेल्या १० दिवसांत साखरेचे मूल्यांकन प्रतिक्विंटल ३०० रुपयांनी कमी केले आहे. मंगळवारी ते आणखी कमी करत २८०० रुपये प्रतिक्विंटलवर आणले आहे. यामुळे कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये आले आहेत.
अनुदान थेट शेतकºयांना
कारखान्यांना थेट अनुदान देणे जागतिक व्यापार संघटनेच्या कराराचे उल्लंघन ठरू शकते. त्यामुळे साखरेवर थेट अनुदान न देता प्रत्येक कारखान्याकडून गाळप होणाºया साखरेवर प्रतिटन ५५ रुपये अनुदान थेट संबंधित ऊस उत्पादक शेतकºयांच्या खात्यावर जमा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
>साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळेच बाजारातील दर घसरत आहेत. त्यामुळे प्रसंगी तोटा सहन करून कारखान्यांनी साखर निर्यात केली पाहिजे, तरच देशातील साखरेचे दर वाढू शकतील आणि आता होणारा तोटा दरवाढीनंतर कारखान्यांना भरून काढता येईल.
- विजय औताडे, साखर उद्योग तज्ज्ञ

Web Title: Sugar reached below, at Rs 2700 per quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.