साखरेला ३६ रुपये हमीभाव मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:16 AM2021-07-12T04:16:31+5:302021-07-12T04:16:31+5:30

कोपार्डे : साखरेला उत्पादन खर्चाएवढा ३६ रुपये हमीभाव व निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून मिळणारे पूर्वीप्रमाणेच प्रतिटन १ हजार २४ रुपये ...

Sugar should get a guaranteed price of Rs | साखरेला ३६ रुपये हमीभाव मिळावा

साखरेला ३६ रुपये हमीभाव मिळावा

Next

कोपार्डे : साखरेला उत्पादन खर्चाएवढा ३६ रुपये हमीभाव व निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून मिळणारे पूर्वीप्रमाणेच प्रतिटन १ हजार २४ रुपये निर्यात अनुदान कायम ठेवून ते वेळेत साखर निर्यातदार कारखान्यांना मिळावे, अशी मागणी कुंभी कासारी कारखान्याचे अध्यक्ष मा. आ. चंद्रदीप नरके यांनी केली.

आज कारखान्याच्या मिलरोलर पूजन कार्यक्रमात अध्यक्ष नरके बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अध्यक्ष नरके म्हणाले. हंगाम २०१९-२० मध्ये गाळप झालेल्या उसाची उच्चांकी एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. अतिरिक्त साखर उत्पादन व हमीभावाप्रमाणे साखरेला दर मिळत नसल्याने प्रत्येक हंगामात राज्यातील साखर उद्योगापुढे मोठे आर्थिक संकट निर्माण होत आहे. केंद्र शासनाने साखरेला प्रतिकिलो ३६ रुपये हमीभाव द्यावा, साखर निर्यात कोठा वाढवावा व पूर्वीप्रमाणे निर्यात अनुदान कायम ठेवावे अशी मागणी चंद्रदीप नरके यांनी केली.

यावेळी संचालक ॲड. बाजीराव शेलार, संजय पाटील, विलास पाटील, प्रकाश पाटील (कोगे), किशोर पाटील, उत्तमराव वरुटे, जयसिंग पाटील, दादासो लाड, प्रकाश पाटील (पाटपन्हाळा), माधुरी पाटील, मयूरी पाटील, भगवान पाटील, आनंदराव पाटील, दिलीप गोसावी कार्यकारी संचालक अशोक पाटील, सचिव प्रशांत पाटील उपस्थित होते.

फोटो

कुंभी कासारी कारखान्याचे मिलरोलर पूजन अध्यक्ष चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर, सर्व संचालक, कार्यकारी संचालक अशोक पाटील, सचिव प्रशांत पाटील.

Web Title: Sugar should get a guaranteed price of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.