Kolhapur News: आंबा घाटात सव्वाशे फूट खोल दरीत साखरेचा ट्रक कोसळला, चालक बालंबाल बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 19:26 IST2023-02-06T19:11:48+5:302023-02-06T19:26:55+5:30
सुदैवाने जिवितहानी टळली

Kolhapur News: आंबा घाटात सव्वाशे फूट खोल दरीत साखरेचा ट्रक कोसळला, चालक बालंबाल बचावला
राजेंद्र लाड
आंबा : साखरेचा ट्रक आंबा घाटातील चक्रीवळणावरून थेट सव्वाशे फूट खोल दरीत कोसळला. मात्र सुदैवाने चालक बालंबाल बचावला. चालक राणा ईरा चावडा (वय ६२, रा पोरबंदर, गुजरात) हे जखमी झाले. अपघातात मोठे नुकसान झाले. मात्र जिवितहानी टळली. आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची नोंद साखरपा पोलिस ठाण्यात झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक चालक चावडा कर्नाटकहून जयगडकडे साखर घेऊन निघाले होते. चक्रीवळणावर येताच गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक क्रमांक (जी.जे.११-झेड-०७३७) संरक्षण कठडा तोडून थेट दरीत सव्वाशे फूट खोल कोसळला. दरीच्या मार्गावर झाडे असल्याने ट्रक हळूहळू कोसळला. यामध्ये राणा केबीनमध्ये अडकले.
यावेळी अमर पारळे व सोबत दोन मित्रांनी चालकास तातडीने केबीनमधून काढून आंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारास दाखल केले. तर पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास पी.आय. प्रदीप पोवार, पो.हेड कॉ. सागर उगळे, प्रताप वाकरे करीत आहे.