उदय कारखान्याची १५ एप्रिलनंतर सभासदांना साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:35+5:302021-03-13T04:43:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बांबवडे : ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक व तोडणीदारांची १५ फेब्रुवारीअखेरची सर्व बिले अदा केली आहेत. १५ ...

Sugar to Uday Karkhana members after April 15 | उदय कारखान्याची १५ एप्रिलनंतर सभासदांना साखर

उदय कारखान्याची १५ एप्रिलनंतर सभासदांना साखर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

बांबवडे : ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक व तोडणीदारांची १५ फेब्रुवारीअखेरची सर्व बिले अदा केली आहेत. १५ एप्रिलनंतर सभासदांना साखर वितरित करण्यात येणार असून, याची माहिती लवकरच सर्व सभासदांना दिली जाईल, अशी माहिती उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखान्याच्या २६ व्या ऑनलाईन वार्षिक सभेच्या निमित्ताने अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांनी दिली.

बांबवडे येथील कारखाना स्थळावरून ऑनलाईन प्रणालीद्वारे ही सभा पार पडली.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढत आहे. यामुळे सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यात आली.

यावेळी संचालक पंडितराव शेळके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नोटीस व प्रोसीडिंगचे वाचन कार्यकारी संचालक भगवानराव पाटील यांनी, तर सूत्रसंचालन जगन्नाथ जोशी यांनी केले.

यावेळी मानसिंगराव गायकवाड म्हणाले की, माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या पुतळ्याचे काम कारखाना स्थळावर गतीने सुरू असून, येत्या दोन महिन्यांत पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंतची ऊस बिले २९०० रुपयांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहेत. यावेळी व्हा. चेअरमन पृथ्वीराज खानविलकर, संचालक रणवीरसिंग गायकवाड, ज्येष्ठ संचालक महादेवराव पाटील, प्रकाश पाटील, अजित पाटील, गणी ताम्हणकर, गणपत पाटील, विष्णू दळवी, शंकरराव पाटील, राजाराम चव्हाण, विलास पाटील, प्रकाश पाटील-थेरगावकर, सुरेश पाटील, आदी संचालक, शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक उपस्थित होते. महादेवराव पाटील यांनी आभार मानले.

११ बांबवडे उदय साखर सभा

फोटो: ऑनलाईन प्रणालीद्वारे झालेल्या २६ व्या वार्षिक सभेत उपस्थित मानसिंगराव गायकवाड, महादेवराव पाटील, भगवानराव पाटील, पंडितराव शेळके व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Sugar to Uday Karkhana members after April 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.