साखर कामगारांची केंद्र सरकारविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:18 AM2021-05-28T04:18:05+5:302021-05-28T04:18:05+5:30
भोगावती : राज्यव्यापी कामगार संघटना, संयुक्त कृती समितीच्या वतीने भोगावती (ता. करवीर) येथील कारखान्यावर केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्यात ...
भोगावती : राज्यव्यापी कामगार संघटना, संयुक्त कृती समितीच्या वतीने भोगावती (ता. करवीर) येथील कारखान्यावर केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच, दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातून मोदीसरकार मार्ग काढण्यास तयार नाही. तसेच, कोविड महामारीतही अत्यंत चुकीची धोरणे राबवत जनतेलाच मृत्यूच्या दारी ढकलण्याचा प्रकार होत आहे. याविरोधात सर्व पुरोगामी पक्षांनीही २६ मे हा दिवस निषेध दिन पाळण्यात आला.
आंदोलनावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सहकारी साखर उद्योग मोडणाऱ्या भाजप सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला. तसेच, साखर कामगारांचे थकीत पगार व देणी ताबडतोब द्यावी. कंत्राटी व ठेकेदारी पद्धत बंद करा. इंदलकर समितीचा एकतर्फी स्टॅफिंग पटर्न रद्द करावा आदी मागण्या करण्यात आल्या. भोगावती, कुंभी-कासारी, छ. राजाराम साखर कामगार संघटना यांनी एकत्र येऊन आंदोलन केले.
भोगावती येथे सभा घेऊन उपाध्यक्ष शिवाजी डोंगळे यांनी निषेध दिनाचे महत्त्व सांगून केंद्र सरकारने वेगवेगळ्या कायद्यांमध्ये बदल केल्याचे सांगितले. या वेळी सहचिटणीस उदय चव्हाण, कामगार प्रतिनिधी संभाजी चौगले, अनिल पाटील, बाजीराव चौगले, पोपट पाटील, धनाजी पाटील, विश्वास चव्हाण, निवृत्ती पाटील आदी कामगार उपस्थित होते.
२७भोगावती साखर आंदोलन
फोटो ओळी :
साखर कामगार संघटनेच्या वतीने भोगावती साखर कारखान्यावर केंद्र सरकारच्या विरोधी घोषणा देत आंदोलन देण्यात आले.