शॉर्टसर्किटमुळे चार एकरांतील उसाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:56+5:302021-02-06T04:44:56+5:30

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, बिद्री ते मुधाळ तिट्टा दरम्यान असलेल्या ब्राम्हणकी नावाच्या शिवारात शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ...

Sugarcane fire in four acres due to short circuit | शॉर्टसर्किटमुळे चार एकरांतील उसाला आग

शॉर्टसर्किटमुळे चार एकरांतील उसाला आग

Next

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, बिद्री ते मुधाळ तिट्टा दरम्यान असलेल्या ब्राम्हणकी नावाच्या शिवारात शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही शेतकऱ्यांनी धाडसाने आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीच्या ज्वालांपुढे त्यांचे काहीच चालत नव्हते.

शेतकऱ्यांनी बिद्री साखर कारखान्याशी संपर्क साधल्यावर अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत राजेंद्र पांडुरंग कुलकर्णी व शिवाजी कृष्णा वारके यांच्या सुमारे चार एकर उसाचे मोठे नुकसान झाले.

फोटो ओळी

बोरवडे (ता. कागल) येथे शॉर्टसर्किटमुळे उसाला लागलेली आग विझविताना शेतकरी.

Web Title: Sugarcane fire in four acres due to short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.