गोरंबेत शाॅर्टसर्किटने उसाला आग(सुधारित बातमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:21 AM2020-12-08T04:21:23+5:302020-12-08T04:21:23+5:30
गोरंबे (ता. कागल) येथे ‘महावितरण’ची तार तुटून लागलेल्या आगीत १२ एकरांतील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे ...
गोरंबे (ता. कागल) येथे ‘महावितरण’ची तार तुटून लागलेल्या आगीत १२ एकरांतील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरुणांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मुळात कालव्याला लवकर पाणी न आल्याने या भागातील ऊस वाळत असून उन्हाच्या कडाक्यामुळे उसाने जोरात पेट घेतला. त्यामध्ये धनपाल कांबळे (२५ गुंठे),धनाजी मारुती ढोले (३० गुंठे),सर्जेराव जाधव (३ एकर),दत्तात्रय निवृत्ती दंडवते ३० गुंठे, अमर भाऊसोा पाटील ३० गुंठे, पिंटू आप्पासोा ढोले ३० गुंठे व ठिंबक, बाबू गणू ढोले ३० गुंठे व ठिंबक,संदीप तुकाराम पाटील ३५ गुंठे व पीव्हीसी पाईपचे नुकसान झाले.
आग आटोक्यात आणण्यासाठी अमर पाटील, दत्तात्रय दंडवते, धनाजी ढोले, संदीप पाटील, हिंदुराव पाटील, पांडुरंग पाटील, राजू जाधव, रघुनाथ हुरे, किरण जाधव, विकास वास्कर,नंदू वास्कर यांनी परिश्रम घेतले.
या भागात अनेक खांब वाकले असून तारा लोंबकळत आहेत. शेतकऱ्यांनी लेखी निवेदन देऊनही ‘महावितरण’ने लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसानीला सामाेरे जावे लागले असल्याची प्रतिक्रिया शाहू कृषी संघाचे संचालक राजू जाधव यांनी दिली.