गोरंबेत शाॅर्टसर्किटने उसाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:20 AM2020-12-08T04:20:57+5:302020-12-08T04:20:57+5:30

गोरंबे (ता. कागल) येथे महावितरणची तार तुटून लागलेल्या आगीत १२ एकरांतील ऊस जळून खाक झाला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे ...

Sugarcane fire by short circuit in Goramba | गोरंबेत शाॅर्टसर्किटने उसाला आग

गोरंबेत शाॅर्टसर्किटने उसाला आग

Next

गोरंबे (ता. कागल) येथे महावितरणची तार तुटून लागलेल्या आगीत १२ एकरांतील ऊस जळून खाक झाला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरुणांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मुळात कालव्याला लवकर पाणी न आल्याने या भागातील ऊस वाळत असून, उन्हाच्या कडाक्यामुळे उसाने जोरात पेट घेतला. यामध्ये धनपाल कांबळे (२५ गुंठे),धनाजी मारुती ढोले (३० गुंठे), विक्रम जाधव साहेब (तीन एकर), दत्तात्रय निवृत्ती दंडवते (३० गुंठे), अमर भाऊसो पाटील (३० गुंठे), पिंटू आप्पासो ढोले (३० गुंठे व ठिंबक), बाबू गणू ढोले (३० गुंठे व ठिंबक), संदीप तुकाराम पाटील ३५ गुंठे व पीव्हीसी पाईपचे नुकसान झाले.

आग आटोक्यात आणण्यासाठी अमर पाटील, दत्तात्रय दंडवते, धनाजी ढोले, संदीप पाटील, हिंदुराव पाटील, पांडुरंग पाटील, राजू जाधव, रघुनाथ हुरे, किरण जाधव, विकास वास्कर, नंदू वास्कर यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Sugarcane fire by short circuit in Goramba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.